भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश सचिव पदी चाळीसगाव येथील रमेश सोनवणे यांची निवड
किशोर शेवरे चाळीसगाव प्रतिनिधी : चाळीसगाव भारतीय जनता पक्षाचे सन्माननीय सदस्य ,दस्केबर्डी गावाचे सुपुत्र, चाळीसगाव येथील नामवंत अशा अभिनव शाळेचे मुख्याध्यापक, भाजपाचे जेष्ठ पदाधिकारी श्री. रमेश जगन्नाथ सोनवणे सर यांची भारतीय जनता पार्टी "महाराष्ट्र प्रदेश ओबीसी मोर्चाच्या सचिव पदी"सुयोग्य नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना नुकतेच भाजपा ओबीसी मोर्चा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष योगेश टिळेकर यांच्या सहिचे नियुक्तीपत्र प्राप्त झाले आहे.
रमेश सोनवणे सर यांच्या ओबीसी मोर्चा प्रदेश सचिव पदी निवडीबद्दल श्री.सुरेश दामु भोळे,(राजूमामा) जिल्हाध्यक्ष भाजपा जळगाव ग्रामीण, श्री.उन्मेश पाटील खासदार जळगाव लोकसभा, श्री.मंगेशदादा चव्हाण आमदार चाळीसगाव विधानसभा, श्री.के.बी.साळुंखे ,जिल्हा उपाध्यक्ष भाजपा, श्री.प्रशांत पालवे, जिल्हा चिटणीस भाजपा, प्रा. सुनील निकम सर , भाजपा तालुकाध्यक्ष चाळीसगाव, श्री.घृष्णेश्वर पाटील भाजपा शहराध्यक्ष चाळीसगाव व संपूर्ण भाजप परिवार चाळीसगाव यांच्या वतीने अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

Comments
Post a Comment