आ.मंगेशदादा चव्हाण यांनी ना.नितीनजी गडकरी यांना दिले चाळीसगाव तालुक्यातील मागण्यांचे निवेदन

 


चाळीसगाव प्रतिनिधी: केंद्रीय रस्ते विकास मंत्री मा.ना.श्री. नितीनजी गडकरी साहेब जळगाव दौऱ्यावर आले असता चाळीसगाव तालुक्याचे आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी चाळीसगाव तालुक्यातील विविध विकासकामांच्या अनुषंगाने मागण्यांचे निवेदन गडकरी साहेब यांना दिले.
         त्यात कन्नड घाटातील बोगदा काम किंवा त्याला पर्यायी पाटणादेवी कळंकी रस्त्याचे सर्वेक्षण करण्यात यावे, चाळीसगाव-जळगाव महामार्गावरील अपूर्ण काम त्वरित पूर्ण करण्यात यावे, चाळीसगाव शहरातील तितुर नदीवरील नवीन पूल व शहरातील राहिलेली लांबीचे चौपदरीकरण करण्यात यावे, दयानंद ते खरजई नाका रस्ता हा पोहोच रस्ता केंद्रीय रस्ते निधीतून करण्यात यावा, धुळे - बोढरे या राष्ट्रीय महामार्गाच्या कामांसाठी तितुर नदीतील गाळाचा वापर करून तीचे खोलीकरण करणे यासंदर्भात मागण्यांचा समावेश आहे. मा.गडकरी साहेब यांनी आमदार मंगेश चव्हाण यांच्या सर्व मागण्यांच्या अनुषंगाने कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्याबद्दल आमदार चव्हाण यांनी गडकरी साहेब यांचे आभार मानले आहेत.

आमदार मंगेश चव्हाण यांची चांगली संकल्पना,

तितुर नदीपात्रातील गाळ काढून तो धुळे महामार्गाच्या नवीन रस्त्याच्या कामांसाठी वापर केल्यास तितुर नदीपात्र होईल... स्वच्छ आणि खोल.  केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना अन्य विविध मागण्यांचे दिले निवेदन.

Comments

Popular posts from this blog

खान्देश नारीशक्ती चा राज्यस्तरीय नारीदिप सन्मान पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

होय आम्ही शिकणार.. संघर्ष करणार - चाळीसगाव येथील स्व.रामराव जिभाऊ पाटील शिष्यवृत्ती प्राप्त ४२५ विद्यार्थ्यांनी केला निर्धार ; आ.मंगेश चव्हाण यांचे शैक्षणिक दातृत्व