वडाळा येथे शहीद जवान सोपान आमले यांच्या स्मारकास अभिवादन
किशोर शेवरे वडाळा प्रतिनिधी : वडाळा येथे शहीद जवान सोपान कौतिक आमले यांच्या स्मारकास दि,६ एप्रिल रोजी कुटंबातील सदस्य व ग्रामस्थ मंडळी यांच्याकडून पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना देऊन विनम्र अभिवादन करण्यात आले. दि,६ एप्रिल २०१० रोजी केंद्रीय रिझर्व पोलीस बल चे जवान शहीद सोपान कौतिक आमले हे दंतेवाडा छत्तीसगढ़ येते देशसेवा करतांना अचानक झालेल्या नक्षली हल्ल्यात झुंज देतांना शहीद झाले होते. त्यांना शहीद होउन १२ वर्ष पूर्ण झाले.
आजही शहिद सोपान आमले यांचे देशासाठी दिलेले बलिदान डोळ्या समोर ठेऊन वडाळा गावातील शेकडो तरुण सैन्यात भरती होऊन देशसेवा करित आहेत.अश्या वीर जवानाच्या आत्म्यास शांती लाभो अशी परमेश्वरास पार्थना मित्र परिवारा कडुन करण्यात आली व शहीद सोपान आमले अमर रहे च्या घोषणा देऊन मित्र परिवार भाऊक झाला होता. त्या प्रसंगी शहीद सोपान आमले यांचे मोठे बंधू माजी वि,का,सो,चेअरमन अशोकनाना आमले,पोलीस पाटील निलेश अहिरराव,सरपंच अशोक आमले,ग्रा,प,सदस्य संजय आमले,हिरामण सुर्यवशी,अशोक अहिरराव,शांताराम आमले,यांच्या सह गावतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments
Post a Comment