चाळीसगाव येथे साकार होणाऱ्या स्वामीनारायण मंदीराच्या पार्श्वभूमीवर आ.मंगेश चव्हाणांनी घेतली महंत स्वामींची भेट
चाळीसगाव प्रतिनिधी: काल कानड, सुरत (गुजरात) येथील निर्माणाधिन असलेल्या BAPS स्वामीनारायण मंदिर येथे संप्रदायाचे सहावे अध्यात्मिक गुरू, प्रकट ब्रह्मस्वरूप महंत स्वामी महाराज यांचे आ.मंगेश चव्हाण यांनी दर्शन घेऊन आशिर्वाद घेतले व चाळीसगाव येथे साकार होणाऱ्या भव्य स्वामीनारायण मंदीर उभारणीसाठी स्वामींनी आ.चव्हाण यांना आशिर्वाद व मोलाचे मार्गदर्शन दिले. यावेळी आ.मंगेश चव्हाण यांच्या सोबत संदीप बेदमुथा, धनंजय चव्हाण, सागर पाटील सुर्यवंशी आदी उपस्थित होते.
ब्रह्मस्वरुप शास्त्री महाराज यांनी १९०७ मध्ये बी. ए. पी. एस. स्वामीनारायण संस्था स्थापन केली होती. सन १७८१ के १८३० या कालावधीत भगवान स्वामीनारायण यांच्या द्वारा प्रबोधित वैदिक आदर्शांना केंद्रस्थानी ठेऊन या संप्रदायाच्या कार्याला प्रवाहित केले आहे. आज या संप्रदायाचे कार्य ९ हजार ९० सत्संग केंद्रांद्वारे संपूर्ण जगात चालू आहे. यात संस्कारधाम, मंदिर निर्मिती, बाल संस्कार, युवा युवती संस्कार, महिला कल्याण केंद्र, सत्संग केंद्र अशी अनेक कार्यांचा समावेश आहे. त्याच बरोबर भुकंपग्रस्त गावांचे पुनर्निर्माण कार्य, दुष्काळग्रस्त गावांमध्ये जलसंचय कार्य, लहान लहान गावात प्राथमिक शाळांची स्थापन तसेच सुसज्ज छात्रालय या आवश्यक बाबींच्या पूर्तीसाठी बी. ए. पी. एस. स्वामीनारायण संस्था अग्रेसर आहे.
Comments
Post a Comment