आणि पुन्हा आमदार मंगेश चव्हाण व वीज वितरण चे अधिक्षक शेख आले आमने सामने
चाळीसगाव प्रतिनिधी: चाळीसगाव तालुक्यातील ६ हजार शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन खंडित केल्या विषयी वीजप्रश्नी आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी काही दिवसांपूर्वी जळगाव येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात आंदोलन केले होते.यावेळी त्यांनी महावितरण चे अधिक्षक अभियंता फारुक शेख यांना खुर्ची ला बांधून कार्यालयाबाहेर खेचून आणले होते. या प्रकरणी आ.मंगेशदादा चव्हाण यांच्यासह चाळीसगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना तब्बल १२ दिवस जेलमध्ये ठेवण्यात आले होते आणि १३ व्या दिवशी आ.चव्हाण यांनी या अन्यायाविरुद्ध महाविकास आघाडी सरकारचे श्राद्ध करुन अनोखे आंदोलन केले होते.
दरम्यान काल महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे सुरू झालेल्या राज्यातील लोडशेडिंग विरोधातील पहिला जन आक्रोश मोर्चा माजीमंत्री आ.गिरीषभाऊ महाजन यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाच्या वतीने जळगावमध्ये काढण्यात आला. जोपर्यंत लोडशेडिंग व शेतकऱ्यांना नियमित वीजपुरवठा संदर्भात ठोस आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाहीत अशी आक्रमक भूमिका गिरिषभाऊ महाजन यांनी घेतली असता जिल्हा भरातून आलेल्या भारतीय जनता पक्षाच्या सर्व लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय येथेच ठिय्या मांडला.आणि यावेळी देखील सामोरे आले ते वीज वितरण कंपनीचे अधिक्षक अभियंता शेख साहेब. त्यांना पाहताच सर्वच कार्यकर्त्यांनी एकच घोषणाबाजी केली आणि शेख साहेबांना घाम फुटला.कारण समोर होते आमदार मंगेशदादा चव्हाण. आ.चव्हाण यांना पाहून शेख घाबरून घाम पुसायला लागले. अखेर वीज वितरण कंपनीचे अधिक्षक अभियंता फारुक शेख यांनी शेतकऱ्यांना होणारा वीजपुरवठा हा कोणत्याही प्रकारची आकस्मिक लोडशेडिंग न करता पूर्वीप्रमाणेच सुरू राहील असे लेखी आश्वासन दिल्यानंतर सदर आंदोलन रात्री ८ वाजता थांबविण्यात आले. गिरिषभाऊंच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाने केलेल्या आंदोलनाचा हा मोठा विजय असून जिल्ह्यातील शेतकरी, सर्वसामान्य वीज ग्राहक, व्यापारी, उद्योजक यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष आ.राजुमामा भोळे, खासदार रक्षाताई खडसे, खासदार उन्मेषदादा पाटील, आ.संजयभाऊ सावकारे, जि.प.अध्यक्ष सौ.रंजनाताई पाटील, माजी आ.स्मिताताई वाघ, जि.प.उपाध्यक्ष लालचंदभाऊ पाटील, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष अशोक कांडेलकर, महानगर जिल्हाध्यक्ष दिपक सूर्यवंशी, किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष पोपटतात्या भोळे, किसान मोर्चा उत्तर महाराष्ट्र संयोजक सुरेश धनके, किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष नारायण बापू चौधरी, जिल्हा उपाध्यक्ष पी.सी.आबा पाटील, जिल्हा उपाध्यक्ष नंदू महाजन, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष श्रीमती रेखा पाटील, जिल्हा सरचिटणीस मधुकर काटे, संगठन सरचिटणीस सचिन पानपाटील, महानगर सरचिटणीस डॉ.राधेश्याम चौधरी, भाजयुमो जिल्हाध्यक्ष श्रीकांत महाजन, अल्प संख्यांक जिल्हाध्यक्ष आरिफ शेख यांच्यासह समस्त भाजपा जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, लोकप्रतिनिधी, प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Comments
Post a Comment