भाजपा स्थापना दिवस आ.मंगेश चव्हाण यांच्या कार्यालयात पेढे भरवून साजरा
चाळीसगाव प्रतिनिधी: जगातील सर्वात मोठा पक्ष असणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या ४२ व्या स्थापना दिनाच्या निमित्ताने चाळीसगाव ग्रामीण व शहर मंडळाची बैठक घेण्यात येऊन पक्ष स्थापना दिवस साजरा करण्यात आला. याप्रसंगी भारतमाता, श्रद्धेय स्व.शामाप्रसाद मुखर्जी व स्व.पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच यावेळी आमदार मंगेश चव्हाण यांनी सर्वांना पेढे भरवून तोंड गोड करत आनंद साजरा केला व शुभेच्छा दिल्या.
यावेळी मंचावर भाजपा जिल्हा सरचिटणीस व तालुका प्रभारी मधूभाऊ काटे, किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष पोपट तात्या भोळे, जिल्हा उपाध्यक्ष के.बी.दादा साळुंखे, युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष कपिल पाटील, तालुकाध्यक्ष प्रा.सुनील निकम सर, शहराध्यक्ष घृष्णेश्वर तात्या पाटील, विधानसभा क्षेत्रप्रमुख अनिलभाऊ नागरे, पंचायत समिती गटनेते संजय तात्या पाटील, माजी पंचायत समिती सभापती दिनेशभाऊ बोरसे, जिल्हा चिटणीस एड.प्रशांतजी पालवे, तालुका सरचिटणीस धनंजय मांडोळे, अमोल चव्हाण, शहर सरचिटणीस अमोल नानकर, जेष्ठ पदाधिकारी रमेश सोनवणे सर यांच्यासह तालुकाभरातील पदाधिकारी, कार्यकर्ते आदी उपस्थित होते.



Comments
Post a Comment