Posts

Showing posts from March, 2021

आ.मंगेश चव्हाण व शेतकऱ्यांना पुर्ण समर्थन- माजी पालकमंत्री आ.गिरीशभाऊ महाजन

Image
आ.मंगेश चव्हाण व शेतकऱ्यांना पुर्ण समर्थन- माजी पालकमंत्री आ.गिरीशभाऊ महाजन   संदिप पाटील जळगाव:  चाळीसगाव येथील आ.मंगेश चव्हाण यांच्यासह तीस शेतकऱ्यांवर पोलीसांनी गुन्हे दाखल करुन ४-५ दिवसांपासून त्यांना जेलमध्ये डांबून ठेवले आहे.हा अत्यंत गंभीर व संतापजनक प्रकार असून आधिच कोरोनामुळे शेतकरी बेजार झाला आहे त्यातच अवकाळी पाऊस,वादळ यामुळे मोठ्या प्रमाणावर शेतीचे नुकसान झाले आहे.उन्हाळा असल्याने शेतकऱ्यांचे पिक अंतिम टप्प्यात असून अचानक विज वितरण कंपनीने शेतकऱ्यांच्या शेतातील विज कनेक्शन कट करुन एक प्रकारे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम शासनाने केले असून याविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना व आ.मंगेश चव्हाण यांना या सरकारने जेलमध्ये टाकून शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला आहे.मी व भारतीय जनता पार्टी आ.मंगेश चव्हाण व शेतकऱ्यांसोबत असून आज त्यांची भेट घेऊन चर्चा केली आहे असं माजी मंत्री आ.गिरीश महाजन म्हणाले.          माजी मंत्री आ.गिरीश महाजन हे कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर गेले १० दिवस उपचार घेतल्यानंतर दि.३० मार्च रोजी घरी आले. ज...

शासनाचे डोकं ठिकाणावर आहे का? गिरीश महाजन यांचा संतप्त सवाल

Image
शासनाचे डोकं ठिकाणावर आहे का? गिरीश महाजन यांचा संतप्त सवाल खान्देश न्यूज नेटवर्क: राज्यात सर्वत्र कोरोनाचा कहर झाला असून सरकार मात्र डोळे झाकुन झोपा काढत आहे. कोरोना परिस्थिती हाताबाहेर गेली आहे, शेतकऱ्यांच्या शेतातील, घरातील वीज पुरवठा खंडित करण्यात येत आहे, आंदोलन करणार्या शेतकऱ्यांना जेलमध्ये टाकण्यात येत आहे, बलात्कार व हत्यांचे प्रमाण दिवसेंदिवस गंभीर होत चालले आहे.अशा परिस्थितीत सरकार मात्र झोपा काढत असून सरकारला या गोष्टींचे काहीच कसे वाटत नाही? या शासनाचे डोकं ठिकाणावर नाही की काय? अशी गंभीर टिका आज माजी मंत्री आ.गिरीश महाजन यांनी राज्य सरकारवर केली आहे.      आ.गिरीश महाजन कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर रुग्णालयात उपचार घेऊन जवळपास दहा दिवसांनी आज पत्रकारांसमोर आले.त्यांनी आज कोवीड सेंटरला भेट देऊन पाहणी केली.यावेळी आ.महाजनांसोबत भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ.राजुमामा भोळे व आ.चंदुलाल पटेल उपस्थित होते.    जामनेर येथील ७०० कोरोना रिपोर्ट सात दिवसांपासून खोळंबले      जामनेर तालुक्यातील जवळपास ७०० पेक्षा जास्त रुग्णांचे कोरोनाचे रिपोर्ट ७...

कोरड्या त्वचेने हैराण? तर वापरा घरगुती ‘स्क्रब’!

Image
कोरड्या त्वचेने हैराण? तर वापरा घरगुती ‘स्क्रब’! खान्देश न्यूज नेटवर्क: लोक त्वचा निरोगी ठेवण्यासाठी नेहमी विविध उपाय ट्राय करतात. निरोगी आणि चमकदार त्वचा मिळवण्यासाठी, विविध सौंदर्य उत्पादनांचा वापर करतात. परंतु, आपणास माहित आहे का की, या महागड्या उत्पादनांऐवजी काही चांगल्या सवयींचा अवलंब करून देखील आपण निरोगी त्वचा मिळवू शकता. या सवयींचा अवलंब केल्याने त्वचा सुधारण्यास सुरुवात होते.        महागड्या उत्पादनांऐवजी आपण घरगुती उपाय केले तरी आपली त्वचा तजेलदार आणि सुंदर दिसू शकते. आज आम्ही तुम्हाला काही खास घरगुती उपाय सांगणार आहोत. ज्यामुळे तुमची त्वचा चांगली होईल. त्वचेतील मृत पेशी आणि त्वचेचा वरचा थर स्वच्छ करणे खूप महत्वाचे आहे जेणेकरुन नवीन त्वचा तयार होऊ शकेल. त्यासाठी हे घरगुती स्क्रब उपयुक्त ठरू शकते. साहित्य- -एक चमचे बेसन पीठ -एक चिमूटभर हळद -थंड दूध किंवा दही -पेस्ट तयार करण्यासाठी हे सर्व मिश्रण एका भांड्यात घ्या आणि चांगली पेस्ट तयार करा. ही पेस्ट आपल्या चेहऱ्यावर आणि मानेवर लावा दहा मिनिटे तसेच राहूद्या. हे सुकल्यानंतर ओलसर हाताने स्वच्छ करा ह...

लॉकडाऊनच्या दृष्टीने प्रशासनाने नियोजन करावे- मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे यंत्रणेला आदेश?

Image
लॉकडाऊनच्या दृष्टीने प्रशासनाने नियोजन करावे-  मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे यंत्रणेला आदेश? खान्देश न्यूज नेटवर्क: राज्यातील वाढत्या कोरोना रुग्ण संख्या आता चिंतेचं कारण बनली आहे. त्यामुळे दिवसेंदिवस झपाट्याने होणाऱ्या वाढीमुळे बेड्स, व इतर आरोग्य सुविधा अपुऱ्या पडू लागल्याचे चित्र दिसून येत आहे. आज झालेल्या टास्क फोर्सच्या बैठकीत लॉकडाऊनसारखे अतिशय कडक निर्बंध त्वरित लावण्यात यावेत अशा सूचना देण्यात आल्या आहेत. या महत्वाच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री डॉ राजेश टोपे तसेच मुख्य सचिव सीताराम कुंटे, टास्क फोर्स डॉक्टर्स व प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी निर्बंध आणि नियमांचे कडक पालन होणार नसेल तर येत्या काही दिवसांत संपूर्ण लॉकडाऊन लावून संसर्ग थोपवावा यावर चर्चा करण्यात आली आहे.      मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयातील तसेच शासकीय व निमशासकीय कार्यालयांतील अभ्यागतांना पूर्ण प्रवेशबंदी घालावी तसेच खासगी कार्यालये व आस्थापना ५० टक्के कर्मचारी संख्येचे निर्बंध पाळत नसतील तर लॉकडाऊनची तयारी करावी अशा स्पष्ट सूचना बैठकीत दिल्या आहेत.    ...

'या' नगरसेविकेने दिला शिवसेनेचा तालुका संघटक पदाचा राजीनामा, भाजपा आ.मंगेश चव्हाण यांच्या आंदोलनाला दिला पाठिंबा

Image
भाजपा आमदार मंगेश चव्हाण व शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ चाळीसगाव शिवसेनेच्या रणरागिणीचा सेनेला जय महाराष्ट्र... नगरसेविका विजया प्रकाश पवार यांचा शिवसेना तालुका महिला संघटक पदाचा राजीनामा मी शेतकऱ्याची मुलगी... पण शेतकऱ्यांवर आलेल्या दुर्दैवी वेळेत महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहायला हवे होते परंतु उलट शेतकऱ्यांसाठी आंदोलन करणार्यांनावर गुन्हे दाखल करून अटक करत असल्याची व्यक्त केली खंत... चाळीसगाव प्रतिनिधी -  शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आक्रमक विचारांनी व आंदोलनांनी प्रेरित होऊन व शेतकरी व सर्वसामान्यांच्या हितासाठी आक्रमकपणे काम करणारी संघटना म्हणून मी शिवसेनेचे काम सुरु केले. मी देखील शेतकऱ्याची मुलगी,पत्नी व बहिण आहे. आमदार मंगेशदादा चव्हाण व शेतकऱ्यांना झालेल्या अटकेमुळे मी व्यथित झाले आहे. शेतकऱ्यांच्या तीव्र स्वरूपाच्या निषेधाच्या प्रतिक्रिया या घटनेमुळे चाळीसगाव तालुक्यातून येत आहेत. जर आपले शिवसेनेचे सरकार असताना शेतकऱ्यांवर अश्या पद्धतीने अन्याय होत असेल तर शिवसेना संघटनेच्या पदावर  राहण्याच्या नैतिक अधिकार मला एक शेतकरी कन्या म्...

महावितरण चे डोके ठिकाणावर आहे का-आ.मंगेश चव्हाण यांचा संतप्त सवाल

Image
महावितरण चे डोके ठिकाणावर आहे का?  आ.मंगेश चव्हाण यांनी महावितरण चे अधिक्षक अभियंता यांना दोरीने बांधून विचारला जाब जळगाव प्रतिनिधी : मी शेतकऱ्याचा मुलगा... आमदार मिरविण्यासाठी झालो नाही तर सर्वसामान्य जनता व शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी झालो - आ.मंगेश चव्हाण       विविध संकटांच्या जोखडात अडकलेल्या शेतकऱ्यांच्या कथा आणि व्यथा मांडण्यासाठी आज वीज वितरण कंपनीचा व महाविकास आघाडी सरकारचा निषेध म्हणून चाळीसगाव विधानसभा मतदारसंघाचे भाजपा आमदार श्री.मंगेश चव्हाण यांनी महावितरण चे जळगावचे अधिक्षक अभियंता यांना चपलांचा हार घालून त्यांना दोरीने बांधले. शेतकऱ्यांची वीज तोडणी तात्काळ थांबविण्यात यावी व चाळीसगाव तालुक्यातील ७ हजार शेतीपंप कनेक्शन तात्काळ जोडावी अशी मागणी देखील आ.चव्हाण यांनी यावेळी केली आहे. लवकरात लवकर जर का शेतकऱ्यांचे तोडलेले वीज कनेक्शन जोडले नाही तर मला लोकप्रतिनिधी या नात्याने तीव्र स्वरूपाचे आंदोलन शेतकऱ्यांना सोबत घेऊन करावे लागेल असा सणसणीत इशारा देखील यानिमित्ताने आ.चव्हाण यांनी महावितरण ला दिला    चाळीसगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना...

जळगाव जिल्ह्यात तीन दिवस लॉकडाउन? होळी व धुलीवंदनाच्या पार्श्वभूमीवर कडक निर्बंध

Image
जळगाव जिल्ह्यात तीन दिवस लॉकडाउन? होळी व धुलीवंदनाच्या पार्श्वभूमीवर कडक निर्बंध जळगाव प्रतिनिधी: होळी आणि धुलीवंदनाच्या पार्श्वभूमिवर गर्दी होऊन कोरोनाचा प्रसार वाढीस लागू नये यासाठी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी २८ ते ३० मार्च या कालावधीत विशेष निर्बंध लागू केले असून याबाबतचे निर्देश आज जारी करण्यात आले आहेत.      जिल्ह्यात कोरोनाच्या रूग्णांची संख्या वाढीस लागल्याने प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाली आहे. या पार्श्वभूमिवर, जिल्हाधिकाऱ्यांनी निर्देश जारी केले आहेत. यात म्हटले आहे की, जळगाव जिल्ह्यात २८ मार्च रोजी होळी व २९ मार्च रोजी धुलीवंदन साजरा होत आहे. त्यामुळे नागरीकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी २८ मार्च ते ३० मार्च रोजी रात्री १२ वाजेपर्यंत निर्बंध लागू करण्यात आले आहे. ठळक मुद्दे -  सर्व बाजारपेठ, आठवडी बाजार बंद राहतील. किराणा दुकाने इतर सर्व दुकाने बंद राहतील, किरकोळ भाजीपाला, फळ खरेदी विक्री केंद्र बंद राहतील. शैक्षणिक संस्था, शाळा, महाविद्यालय, खासगी क...

मोठी बातमी : महाराष्ट्रातील ‘या’ १४ जिल्ह्यांमध्ये लागणार लॉकडाऊन?

Image
मोठी बातमी : महाराष्ट्रातील ‘या’ १४ जिल्ह्यांमध्ये लागणार लॉकडाऊन? खान्देश न्यूज नेटवर्क : कोरोनाचा धोका पुन्हा एकदा वाढत चाललेला आहे. कोरोनाचा रुग्णांचा वाढता आकडा लक्षात घेता चिंता व्यक्त केली जात आहे. सरकारकडून देखील राज्यातील काही भागामध्ये कडक निर्बंध लावण्यात आले आहे. तरी देखील अनेक नागरिक कोरोनाच्या नियमनाचे पालन करताना दिसत नाही. लोकांना गांभीर्य नसल्याचे वाढत्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.२०२० मधील देशव्यापी लॉकडाऊनच्या घोषणेला आज एक वर्ष पूर्ण होत असतानाच महाराष्ट्राच्या चिंतेत आणखी भर पडली आहे. महाराष्ट्रातील १४ जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन लागण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात वेगाने होणारा कोरोनाचा प्रसार लक्षात घेतला, राज्य सरकार हे पाऊल उचलण्याची शक्यता आहे.नांदेड, परभणी आणि बीड या जिल्ह्यामध्ये आज मध्यरात्रीपासून लॉकडाऊन ची घोषणा करण्यात आलेली आहे. तसेच राज्यातील अन्य १४ जिल्ह्यामध्ये लॉकडाऊन होण्याची शक्यता आता वर्तवली जात आहे.मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद, अहमदनगर, जळगाव, जालना, अमरावती, बुलडाणा, अकोला, यवतमाळ आणि वर्धा या जिल...

खान्देश नारीशक्ती अध्यक्षा सौ.दिपाली चौधरी झोपे यांना पितृशोक

Image
खान्देश नारीशक्ती अध्यक्षा सौ.दिपाली चौधरी झोपे यांना पितृशोक फैजपूर प्रतिनिधी:   फैजपूर येथील ज्येष्ठ समाजसेवक श्री.रेवा चुडामण चौधरी ऊर्फ रेवा बाबा ट्रॅक्टरवाले यांचे वयाच्या ६७ व्या वर्षी दि.२१ मार्च रोजी संध्याकाळी ०८:३० वाजता हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले.त्यांची अंत्ययात्रा दि.२२ रोजी सकाळी ०९ वाजता तुप बाजार फैजपूर येथील राहत्या घरुन कोरोनाचे सर्व नियम पाळून मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत काढण्यात आली.ते सामाजिक कार्यकर्त्या व खान्देश नारीशक्ती अध्यक्षा दिपाली चौधरी झोपे यांचे वडील आणि दिपाली मोबाईल शॉप चे संचालक श्री‌.देवेंद्र झोपे यांचे सासरे होत.स्व.रेवा बाबा चौधरी यांचा दशक्रिया विधी दि.३० मार्च व उत्तरकार्य दि.३१ मार्च रोजी करण्यात येणार आहे.फैजपूर शहर व पंचक्रोशीतील प्रत्येक गोरगरीब कुटुंबाला स्व.रेवाबाबा नेहमीच मदत करत असत.अनेक अशिक्षित बेरोजगारांना त्यांनी रोजगार उपलब्ध करून चरितार्थ चालवण्यासाठी मदतीचा हात दिला होता.त्यांच्या अकाली जाण्याने फैजपूर पंचक्रोशीत सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

पालकांसाठी महत्वाची सुचना... खासगी शाळांमधील शुल्काबाबत आपलं मत कळवा शासनाला

Image
पालकांसाठी महत्वाची सुचना... खासगी शाळांमधील शुल्काबाबत आपलं मत कळवा शासनाला खान्देश न्यूज नेटवर्क : खाजगी शाळांमधील शुल्काबाबत महाराष्ट्र शैक्षणिक संस्था (शुल्क विनियमन) अधिनियमांमध्ये सुधारणा सुचवण्यासाठी पालक, पालक संघटना, शैक्षणिक संस्था तसेच सर्वसामान्य नागरिकांकडून सूचना मागविण्यात येत आहेत.    या सूचना शालेय शिक्षण विभागाने गठीत केलेली समिती ग्राह्य धरणार आहे. दरम्यान, पुढील एक महिना  www.research.net/r/feeregulation  या संकेतस्थळावर सूचना नोंदवता येतील, अशी माहिती शालेय शिक्षण विभागाने एका परिपत्रकाद्वारे दिली आहे.

धक्कादायक: गेल्या २४ तासात वाढली महाराष्ट्रातील आजपर्यंतची सर्वात मोठी कोरोना रुग्णसंख्या

Image
धक्कादायक: गेल्या २४ तासात वाढली महाराष्ट्रातील आजपर्यंतची सर्वात मोठी कोरोना रुग्णसंख्या टिम खान्देश न्यूज नेटवर्क : महाराष्ट्रात कोरोना थैमान घालताना दिसत आहे. गुरुवारी महाराष्ट्रात २४ तासांत २५ हजारांपेक्षा अधिक रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. चिंतेची बाब म्हणजे रुग्णवाढीचा हा आकडा महाराष्ट्राने आजवर नोंदवलेला सर्वाधिक आकडा आहे. गेल्यावर्षी जेव्हा जगभर सर्वत्र कोरोनाचा हाहाकार सुरु होता तेव्हादेखील महाराष्ट्राने कधी २४ तासांत २५ हजारांपेक्षा अधिक रुग्णसंख्या नोंदवली नव्हती.         गुरुवारी भारतात कोविडचे ३५,८७१ नवे रुग्ण आढळून आले. रुग्णसंख्येच्या बाबतीत गेल्या १०२ दिवसांमधली ही सर्वाधीक वाढ आहे. या नव्या रुग्णांमध्ये सर्वाधिक रुग्णसंख्या ही महाराष्ट्रात नोंदवली गेली. गुरुवारी महाराष्ट्रात २५,८३३ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली. ही आजवर महाराष्ट्रात २४ तासांत नोंदवलेली सर्वाधिक रुग्णवाढ आहे. गेल्या वर्षी जेव्हा जगभर कोरोना फोफावला होता तेव्हा महाराष्ट्रात ११ सप्टेंबर २०२० रोजी सर्वाधिक रुग्णांची वाढ नोंदवण्यात आली होती. तो आकडा २४,८८६ इतका होता. गुर...

"बालकांना सुसंस्कारांनी घडविणे बाल साहित्यिकांचे अजोड कार्य" बाल साहित्यिका सौ.माया धुप्पड यांचे प्रतिपादन

Image
"बालकांना सुसंस्कारांनी घडविणे बाल साहित्यिकांचे अजोड कार्य" बाल साहित्यिका सौ.माया धुप्पड यांचे प्रतिपादन [ साहित्य अकादमी पुरस्कार घोषित सुप्रसिद्ध बालकवी  आबा  महाजनांच्या सन्मानार्थ त्यांच्या  निवडक कवितांचे अभिवाचन ]     " बालकांना सुसंस्कारांनी घडविणे बालसाहित्यिकांचे अजोड कार्य आहे. आबा महाजनांच्या जात्याच दर्जेदार साहित्याला अकादमीच्या पुरस्काराची मोहर लागली यामुळे खान्देशच्या मुला फुलांचाही सन्मान वाढलाय.आबा महाजन आज शिक्षकी पेशात  नसले तरी ते बालकांवर सुसंस्कार करणारे कालातीत अक्षय समाजशिक्षक आहेत हे पुरस्काराने सिद्ध केले." असे गौरवोद्गार सुप्रसिद्ध बालसाहित्यिका सौ.माया धुप्पड यांनी केले.      जळगाव प्रतिनिधी:   एरंडोलकर बालसाहित्यिक आबा महाजन यांना नुकताच "आबाची गोष्ट " या बालकथा संग्रहास साहित्य अकादमीचा पुरस्कार घोषित झाला आहे.त्यांच्या सन्मानार्थ भारतरत्न डॉक्टर ए.पी.जे.अब्दुल कलाम पुस्तक भिशी जळगाव आणि संलग्न शाखा तालुका पाचोरा यांच्या संयुक्त विद्यमाने ऑनलाईन आबा महाजनांच्या कवितांचा अभिवाचनाचा कार्यक्र...

शेतकऱ्यांसाठी खुशखबर..."या योजनेसाठी करा ताबडतोब अर्ज

Image
पॉवर टिलर ते ट्रॅक्टर, रोटावेटरसाठी अनुदान मिळणाऱ्या कृषी यांत्रिकीरण उप अभियानासाठी अर्ज कसा करावा? कृषी यांत्रिकीकरण उप अभियानातून शेतकऱ्यांना ट्रॅक्टर, पॉवर टिलर, शेतीमधील अवजारे, बैल चलित अवजारे, पक्रिया संच, इतर औजारांसाठीअनुदान उपलब्ध करुन देण्यात येते आहे. खान्देश न्यूज नेटवर्क: उन्नत शेती-समृद्ध शेतकरी मोहिमेंतर्गत कृषी यांत्रिकीकरणास मोठ्या प्रमाणात चालना देण्याच्या दृष्टीनं राज्य सरकारनं भरीव निधी उपलब्ध करुन दिला आहे. सध्या शेतीमध्ये पारंपारिक औजारांचा वापर कमी होऊन यांत्रिकीकरण वाढत आहे. शेतीमधील मशागतीची कामं करण्यासाठी हवं तेवढं मनुष्यबळ मिळत नसल्यानं शेतकऱ्यांना ट्रॅक्टर आणि इतर औजारांचा वापर करणं गरजेचे बनत आहे. महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग कृषी यांत्रिकीकरण उप अभियानातून शेतकऱ्यांना ट्रॅक्टर, पॉवर टिलर, शेतीमधील अवजारे, बैल चलित अवजारे, पक्रिया संच, इतर औजारांसाठीअनुदान उपलब्ध करुन देत आहे. (Sub Mission Farm Mechanization how to apply for farm equipment’s know details for application on Maha DBT farmer Portal) कृषी यांत्रिकीकरण उप अभियानासाठी अर्ज कुठे कर...

धक्कादायक... ज्वारी पिकाला दाणेच आले नाहीत?आ.मंगेशदादा चव्हाण अधिकार्यांसह रात्री शेतात

Image
हायटेक कंपनीच्या ज्वारीला दाणेच आले नाहीत? आ.मंगेश चव्हाणांनी रात्री कृषी अधिकाऱ्यांना नेले शेतात संदिप पाटील चाळीसगाव :  हायटेक कंपनीच्या ३२०६ ज्वारी पिकाच्या बियाण्यामुळे चाळीसगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिकाला दाणेच न लागल्याने मोठे आर्थिक नुकसान झाल्याने आज कृषी अधिकारी, कृषी केंद्र चालक व शेतकऱ्यांसह आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी रात्री ०८ वाजेच्या दरम्यान शेतात जाऊन पिकांची पाहणी केली.      चाळीसगाव तालुक्यातील खरजई,तरवाडे,बोरखेडा सहीत अनेक गावांमध्ये शेकडो एकर जमीनीवर शेतकऱ्यांनी हैदराबाद येथील हायटेक कंपनीच्या ३२०६ या ज्वारी बियाण्याची पेरणी केली होती.परंतू सदर ज्वारी च्या पिकाला दाणेच आले नसल्याने शेतकऱ्यांची फसवणूक झाली असल्याचे शेतकऱ्यांच्या लक्षात आल्यावर शेतकऱ्यांनी लगेचच आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या कडे यासंदर्भात तक्रार केली.         आमदार मंगेशदादा चव्हाण यांना माहिती मिळताच संध्याकाळी साडेसात वाजता अंधार पडला होता तरीही आमदारांनी संबंधित कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना, व्यापार्यांना तसेच कृषी केंद्र चालकां...

खिरोदा येथील प्रा.डॉ.प्रतिभा तुकाराम बोरोले यांना नारी रत्न जीवन गौरव पुरस्कार जाहीर

Image
खिरोदा येथील प्रा.डॉ.प्रतिभा तुकाराम बोरोले यांना नारी रत्न जीवन गौरव पुरस्कार जाहीर फैजपूर प्रतिनिधी: जागतिक महिला दिनानिमित्त राज्यस्तरीय नारिदिप सन्मान २०२१ पुरस्कारांची घोषणा काल करण्यात आली.यामध्ये अध्यापक विद्यालय खिरोदा येथील प्राध्यापिका व रावेर पंचायत समिती सदस्या यांना राज्यस्तरीय नारी रत्न जीवन गौरव पुरस्कार २०२१ जाहीर झाला आहे.खान्देश जनसेवा फाऊंडेशन व खान्देश न्युज नेटवर्क यांच्या वतीने देण्यात येणाऱ्या या पुरस्कारांची घोषणा काल सायंकाळी करण्यात आली.          सौ.प्रतिभा तुकाराम बोरोले यांनी शैक्षणिक तसेच सामाजिक, राजकीय, साहित्य व सांस्कृतिक इत्यादी क्षेत्रात आजपर्यंत केलेल्या उल्लेखनीय कामगिरी बद्दल त्यांना आतापर्यंत विविध संस्थांकडून पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.सौ.बोरोले या गेली २९ वर्षं अविरतपणे ज्ञानदानाचे पवित्र कार्य करत असून यासोबतच त्यांनी रावेर तालुका माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पतपेढी च्या उपाध्यक्ष म्हणून तसेच कुसुमताई चौधरी महिलांची सहकारी पतपेढी खिरोदा संचालिका म्हणून देखील जबाबदारी सांभाळली आहे.त्या खान्दे...

चाळीसगावची आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटरवर?आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी घेतली झाडाझडती

Image
आमदार मंगेश चव्हाण यांची चाळीसगाव कोविड सेंटरला रात्री साडेबारा वाजता भेट... रुग्णांच्या जीवाशी खेळणारा जीवघेणा प्रकार उघड... रुग्णाची ऑक्सिजन लेव्हल १५ मात्र तातडीने हलविण्यासाठी असणारी रुग्णवाहिका ५ दिवसांपासून पंक्चर... ४० रुग्णांसाठी केवळ २ कर्मचारी,  अस्वच्छता व देखभाल बाबत यापूर्वीच तक्रार... चाळीसगाव प्रतिनिधी- कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत चाळीसगाव हॉटस्पॉट बनत असताना लोकसहभागातून उभारण्यात आलेल्या कोविड सेंटर येथे रुग्णांची होणारी वाताहात व सेंटरची झालेली दुरावस्था आमदार मंगेश चव्हाण यांच्या सरप्राईज व्हिजिट ने उघड झाली आहे. काल दि.१३ मार्च रोजी रात्री चाळीसगाव येथील कोविड सेंटर येथून एका रुग्णाच्या तब्बेतीसंदर्भात पवार नामक व्यक्तीचा आमदार मंगेश चव्हाण यांना फोन आला असता रात्री साडेबारा वाजता आमदार चव्हाण हे कोविड सेंटर येथे दाखल झाले. त्यावेळी जे अतिशय विदारक असे चित्र कोविड सेंटरमध्ये दिसून आले त्याने रुग्णांशी सुरू असलेला जीवघेणा खेळ उघडकीस आला. राखुंडे नामक रुग्णाची ऑक्सिजन लेव्हल १५ वर आलेली असताना त्यांना हलवण्यासाठी शासनाने जी कार्डियाक रुग्णवाहि...

फैजपूर-पिंपरूड फाट्यावर अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार पिता-पुत्र ठार

Image
फैजपूर-पिंपरूड फाट्यावर अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार पिता-पुत्र ठार फैजपुर प्रतिनिधि:- शनिवार रोजी सकाळी पिंपरुड फाट्याजवळ दुचाकी ला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने पिता ठार तर पुत्र गंभीर झाला होता. मात्र या अपघातात गंभीर जखमी असलेल्या पुत्राचा उपचार सुरू होण्याआधीच मृत्यू झाला. या अपघातात एकाच घरातील दोन जण ठार झाल्याने संपूर्ण शहरावर शोककळा पसरली आहे.          गुरुदत्त कॉलनी येथील रहिवासी गोपाल पाटील (वय 66) व त्यांचा मुलगा खेमा गोपाल पाटील(वय 35 )दुचाकी क्रमांक एमएच 19 बिडी 5442 वरुन दोघे आपल्या मूळ गावी चिखली येथे गेले होते. तेथून ते शनिवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास फैजपुर शहरात परतत असतांना भुसावळ-फैजपूर रस्त्याच्या जवळील पिंपरुड फाट्याजवळ एका अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली. या अपघातात गोपाळ पाटील हे जागीच ठार झाले. तर खेमा पाटील हा गंभीर जखमी झाला.अपघाताचे वृत्त कळताच फैजपूर येथील भरत अरोरा व अमोल चौधरी, सुधाकर चौधरी, विकी जैस्वाल, मुकेश मेढे, समर्थ सोनार,मुकेश हिवरे ,संदीप तायडे पराग सराफ यांच्यासह नागरिकांनी धाव घेतली.गंभ...

जिल्हा परिषद अध्यक्षा कोरोना पॉझिटिव्ह,लक्षणे मात्र सौम्य

Image
जिल्हा परिषद अध्यक्षा कोरोना पॉझिटिव्ह,लक्षणे मात्र सौम्य जळगाव प्रतिनिधी : जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असुन आज जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ.रंजना प्रल्हाद पाटील यांचादेखील रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.त्यांना सध्या सौम्य लक्षणे असून त्यांच्यावर घरीच उपचार प्रारंभ करण्यात आले आहेत.  "गेल्या ४-५ दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी खबरदारी चा उपाय म्हणून कोरोना चाचणी करुन घ्यावी" असे आवाहन यावेळी जि.प.अध्यक्षा सौ.रंजना पाटील यांनी केले आहे. आज दिवसभरात...       दरम्यान आज दिवसभरात जिल्ह्यात ४५७६ जणांची तपासणी करण्यात आली असून आज एकुण ९८२ जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत तर ५१२ रुग्ण आज कोरोनामुक्त झाले आहेत.

जळगाव जिल्ह्यातील 'या दोन' शहरांमध्ये दोन दिवस जनता कर्फ्यु???

Image
जळगाव जिल्ह्यातील 'या दोन' शहरांमध्ये दोन दिवस जनता कर्फ्यु??? चाळीसगाव आणि चोपडा नगरपरिषद हद्दित १३ व १४ मार्च रोजी कडक निर्बंध जळगाव प्रतिनिधी: जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी साथ रोग प्रतिबंधात्मक कायदा, 1897 व आपत्ती व्यवस्थापन कायदा, 2005 अन्वये मिळालेल्या अधिकाराचा वापर करुन १४ मार्च रोजी चाळीसगाव ,  चोपडा सह जिल्ह्यातील नगरपरिषदांच्या हद्दीत दोन दिवसांसाठी निर्बंध आदेश आज पारित केले आहे.    सार्वजनिक आरोग्य मंत्रालय यांचे 14 मार्च, 2020 रोजीच्या पत्रानुसार राज्यात साथ रोग प्रतिबंधात्मक कायदा, 1897 लागू झाला आहे प्रत्येक जिल्ह्याचे जिल्हाधिकारी त्यांचे कार्यक्षेत्रात कोव्हिड 19 नियंत्रणासाठी सक्षम प्राधिकारी आहेत. मुख्यमंत्री यांनीही 16 फेब्रुवारी रोजी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे उपाययोजनांचे निर्देश दिलेले आहेत. पुढिल गोष्टींना लागू राहतील निर्बंध          जळगांव जिल्हयातील चोपडा, चाळीसगांव व अमळनेर इत्यादी नगरपालिकांच्या हद्दीत निर्बंध लागू करणे आवश्यक असल्याने जिल्हयातीन चोपडा व चाळीसगा...

राज्यस्तरीय खान्देश कन्या नारी गौरव,नारी रत्न,नारीदिप व जीवन गौरव पुरस्कारांची झाली घोषणा

Image
राज्यस्तरीय खान्देश कन्या नारी गौरव,नारी रत्न व नारीदिप पुरस्कारांची झाली घोषणा विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा होणार सन्मान जळगाव प्रतिनिधी: खान्देश जनसेवा फाऊंडेशन व खान्देश न्युज नेटवर्क यांच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त राज्यस्तरीय पुरस्कारासाठी नामांकन मागविण्यात आले होते.काल या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे.राज्यस्तरीय नारी रत्न जीवन गौरव पुरस्कार खिरोदा येथील सौ.प्रतिभा तुकाराम बोरोले यांना जाहीर झाला आहे.      खान्देश कन्या राज्यस्तरीय नारी गौरव पुरस्कारासाठी भुसावळ येथील रहिवासी व सध्या कतार या देशात व्यास्तव्यास असलेल्या प्रा.डॉ.अरुणा धाडे,बामणोद येथील रहिवासी व मोहमांडली या आदिवासी भागात आरोग्य सेवा देणाऱ्या आरोग्य सेविका श्रीमती पल्लवी पुरुषोत्तम भारंबे तसेच रावेर पंचायत समितीच्या सदस्या व सामाजिक कार्यकर्त्या सौ.योगिता रामदास वानखेडे यांना जाहीर झाला असून राज्यस्तरीय नारीरत्न सन्मान पुरस्कार स्मार्ट ग्राम चिनावलच्या लोकनियुक्त महिला सरपंच सौ.भावना योगेश बोरोले,भादली केंद्राच्या केंद्रप्रमुख, शिक्षिका श्रीमती वैशाली...

राज्यस्तरीय "नारीदिप सन्मान पुरस्कार" साठी महिलांनी प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन

Image
राज्यस्तरीय "नारीदिप सन्मान पुरस्कार" साठी महिलांनी प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन जळगाव प्रतिनिधी: जागतिक महिला दिनानिमित्त राज्यस्तरीय नारिदिप सन्मान २०२१ पुरस्कार साठी प्रस्ताव पाठवण्याची शेवटची तारीख ०८ मार्च असुन लवकरात लवकर आपले प्रस्ताव पाठवावे असे आवाहन खान्देश जनसेवा फाऊंडेशन तर्फे करण्यात आले आहे.विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान राज्यस्तरीय नारिदिप सन्मान पुरस्कार प्रदान करुन त्यांना विविध मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात येणार आहे.             सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय,कला, क्रिडा, साहित्य,व्यवसाय व राजकीय इत्यादी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व उपक्रमशील महिलांचा राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करुन सन्मान करण्यात येणार आहे.या पुरस्कारासाठी महाराष्ट्र तसेच गुजरात व मध्यप्रदेश येथील महाराष्ट्रीयन महिला देखील प्रस्ताव पाठवू शकता.सर्व प्रस्ताव संस्थेकडे प्राप्त झाल्यानंतर तज्ञ समीतीकडून प्रस्तावांची पाहणी करून पुरस्कारार्थींचे नावे जाहीर करण्यात येतील.प्रस्तावांसाठी खान्देश जनसेवा फाऊंडेशन अध्यक्ष श्री.एस...