खिरोदा येथील प्रा.डॉ.प्रतिभा तुकाराम बोरोले यांना नारी रत्न जीवन गौरव पुरस्कार जाहीर
खिरोदा येथील प्रा.डॉ.प्रतिभा तुकाराम बोरोले यांना नारी रत्न जीवन गौरव पुरस्कार जाहीर
फैजपूर प्रतिनिधी: जागतिक महिला दिनानिमित्त राज्यस्तरीय नारिदिप सन्मान २०२१ पुरस्कारांची घोषणा काल करण्यात आली.यामध्ये अध्यापक विद्यालय खिरोदा येथील प्राध्यापिका व रावेर पंचायत समिती सदस्या यांना राज्यस्तरीय नारी रत्न जीवन गौरव पुरस्कार २०२१ जाहीर झाला आहे.खान्देश जनसेवा फाऊंडेशन व खान्देश न्युज नेटवर्क यांच्या वतीने देण्यात येणाऱ्या या पुरस्कारांची घोषणा काल सायंकाळी करण्यात आली.
सौ.प्रतिभा तुकाराम बोरोले यांनी शैक्षणिक तसेच सामाजिक, राजकीय, साहित्य व सांस्कृतिक इत्यादी क्षेत्रात आजपर्यंत केलेल्या उल्लेखनीय कामगिरी बद्दल त्यांना आतापर्यंत विविध संस्थांकडून पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.सौ.बोरोले या गेली २९ वर्षं अविरतपणे ज्ञानदानाचे पवित्र कार्य करत असून यासोबतच त्यांनी रावेर तालुका माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पतपेढी च्या उपाध्यक्ष म्हणून तसेच कुसुमताई चौधरी महिलांची सहकारी पतपेढी खिरोदा संचालिका म्हणून देखील जबाबदारी सांभाळली आहे.त्या खान्देश साहित्य परिषदेच्या जळगाव जिल्हा सचिव व रावेर पंचायत समिती सदस्य पदांची देखील जबाबदारी पार पाडत आहेत.जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल आ.शिरीषदादा चौधरी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर व पदाधिकाऱ्यांकडून सौ.प्रतिभा बोरोले यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
Comments
Post a Comment