महावितरण चे डोके ठिकाणावर आहे का-आ.मंगेश चव्हाण यांचा संतप्त सवाल
महावितरण चे डोके ठिकाणावर आहे का? आ.मंगेश चव्हाण यांनी महावितरण चे अधिक्षक अभियंता यांना दोरीने बांधून विचारला जाब
जळगाव प्रतिनिधी: मी शेतकऱ्याचा मुलगा...
आमदार मिरविण्यासाठी झालो नाही तर सर्वसामान्य जनता व शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी झालो - आ.मंगेश चव्हाण
विविध संकटांच्या जोखडात अडकलेल्या शेतकऱ्यांच्या कथा आणि व्यथा मांडण्यासाठी आज वीज वितरण कंपनीचा व महाविकास आघाडी सरकारचा निषेध म्हणून चाळीसगाव विधानसभा मतदारसंघाचे भाजपा आमदार श्री.मंगेश चव्हाण यांनी महावितरण चे जळगावचे अधिक्षक अभियंता यांना चपलांचा हार घालून त्यांना दोरीने बांधले. शेतकऱ्यांची वीज तोडणी तात्काळ थांबविण्यात यावी व चाळीसगाव तालुक्यातील ७ हजार शेतीपंप कनेक्शन तात्काळ जोडावी अशी मागणी देखील आ.चव्हाण यांनी यावेळी केली आहे. लवकरात लवकर जर का शेतकऱ्यांचे तोडलेले वीज कनेक्शन जोडले नाही तर मला लोकप्रतिनिधी या नात्याने तीव्र स्वरूपाचे आंदोलन शेतकऱ्यांना सोबत घेऊन करावे लागेल असा सणसणीत इशारा देखील यानिमित्ताने आ.चव्हाण यांनी महावितरण ला दिला
चाळीसगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना सुरळीत वीज पुरवठा करण्यात यावा यासाठी आ.मंगेश चव्हाण यांनी अनेकदा अधिक्षक अभियंता यांना लेखी सूचना केल्या मात्र त्यांची दखल घेतली गेली नाही. चालू तीन महिन्यांचे बिल भरण्याचे कारण सांगून शेतकऱ्यांच्या वीज जोडण्या तोडण्यात आल्या, जेव्हा शेतकरी बिल भरायला गेले तेव्हा मात्र मागील १० वर्षाची थकबाकी भरा म्हणून अधिकारी सांगतात. मागील २ वर्षांपासून शेतकऱ्यांना उत्पन्न नाही त्यात यावर्षी गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे पीक जमीनदोस्त झाले.चाळीसगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार मंगेश चव्हाण हे गेली चार दिवस शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांना धीर देत आहेत. त्यात वीज कनेक्शन कट केल्याने काढणीसाठी आलेल्या पिकांना पाणी देता येत नाही, दुधदुभत्या जनावरांना प्यायला पाणी नाही अशी सर्व विदारक परिस्थिती असताना फक्त आमदार नव्हे तर एक शेतकऱ्याचा मुलगा म्हणून शांत राहणे शक्य नव्हते. मी आमदार मिरविण्यासाठी नाही तर शेतकऱ्यांचे व सर्वसामान्यांचे अश्रू पुसण्यासाठी झालो आहे.अशी रोखठोक प्रतिक्रिया मत आ.मंगेश चव्हाण यांनी यावेळी प्रसारमाध्यमांकडे व्यक्त केली.
Comments
Post a Comment