खान्देश नारीशक्ती अध्यक्षा सौ.दिपाली चौधरी झोपे यांना पितृशोक
खान्देश नारीशक्ती अध्यक्षा सौ.दिपाली चौधरी झोपे यांना पितृशोक
फैजपूर प्रतिनिधी: फैजपूर येथील ज्येष्ठ समाजसेवक श्री.रेवा चुडामण चौधरी ऊर्फ रेवा बाबा ट्रॅक्टरवाले यांचे वयाच्या ६७ व्या वर्षी दि.२१ मार्च रोजी संध्याकाळी ०८:३० वाजता हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले.त्यांची अंत्ययात्रा दि.२२ रोजी सकाळी ०९ वाजता तुप बाजार फैजपूर येथील राहत्या घरुन कोरोनाचे सर्व नियम पाळून मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत काढण्यात आली.ते सामाजिक कार्यकर्त्या व खान्देश नारीशक्ती अध्यक्षा दिपाली चौधरी झोपे यांचे वडील आणि दिपाली मोबाईल शॉप चे संचालक श्री.देवेंद्र झोपे यांचे सासरे होत.स्व.रेवा बाबा चौधरी यांचा दशक्रिया विधी दि.३० मार्च व उत्तरकार्य दि.३१ मार्च रोजी करण्यात येणार आहे.फैजपूर शहर व पंचक्रोशीतील प्रत्येक गोरगरीब कुटुंबाला स्व.रेवाबाबा नेहमीच मदत करत असत.अनेक अशिक्षित बेरोजगारांना त्यांनी रोजगार उपलब्ध करून चरितार्थ चालवण्यासाठी मदतीचा हात दिला होता.त्यांच्या अकाली जाण्याने फैजपूर पंचक्रोशीत सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
Comments
Post a Comment