राज्यस्तरीय "नारीदिप सन्मान पुरस्कार" साठी महिलांनी प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन

राज्यस्तरीय "नारीदिप सन्मान पुरस्कार" साठी महिलांनी प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन

जळगाव प्रतिनिधी: जागतिक महिला दिनानिमित्त राज्यस्तरीय नारिदिप सन्मान २०२१ पुरस्कार साठी प्रस्ताव पाठवण्याची शेवटची तारीख ०८ मार्च असुन लवकरात लवकर आपले प्रस्ताव पाठवावे असे आवाहन खान्देश जनसेवा फाऊंडेशन तर्फे करण्यात आले आहे.विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान राज्यस्तरीय नारिदिप सन्मान पुरस्कार प्रदान करुन त्यांना विविध मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात येणार आहे.
            सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय,कला, क्रिडा, साहित्य,व्यवसाय व राजकीय इत्यादी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व उपक्रमशील महिलांचा राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करुन सन्मान करण्यात येणार आहे.या पुरस्कारासाठी महाराष्ट्र तसेच गुजरात व मध्यप्रदेश येथील महाराष्ट्रीयन महिला देखील प्रस्ताव पाठवू शकता.सर्व प्रस्ताव संस्थेकडे प्राप्त झाल्यानंतर तज्ञ समीतीकडून प्रस्तावांची पाहणी करून पुरस्कारार्थींचे नावे जाहीर करण्यात येतील.प्रस्तावांसाठी खान्देश जनसेवा फाऊंडेशन अध्यक्ष श्री.एस डी पाटील ९९७५४०५४८८,सौ.आर पी इंगळे ७०५७८९६८०२ यांच्याशी संपर्क साधावा किंवा narideepaward2021@gmail.com या इमेल वर संपर्क साधावा.

Comments

Popular posts from this blog

खान्देश नारीशक्ती चा राज्यस्तरीय नारीदिप सन्मान पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

होय आम्ही शिकणार.. संघर्ष करणार - चाळीसगाव येथील स्व.रामराव जिभाऊ पाटील शिष्यवृत्ती प्राप्त ४२५ विद्यार्थ्यांनी केला निर्धार ; आ.मंगेश चव्हाण यांचे शैक्षणिक दातृत्व