फैजपूर-पिंपरूड फाट्यावर अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार पिता-पुत्र ठार

फैजपूर-पिंपरूड फाट्यावर अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार पिता-पुत्र ठार

फैजपुर प्रतिनिधि:-शनिवार रोजी सकाळी पिंपरुड फाट्याजवळ दुचाकी ला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने पिता ठार तर पुत्र गंभीर झाला होता. मात्र या अपघातात गंभीर जखमी असलेल्या पुत्राचा उपचार सुरू होण्याआधीच मृत्यू झाला. या अपघातात एकाच घरातील दोन जण ठार झाल्याने संपूर्ण शहरावर शोककळा पसरली आहे. 
        गुरुदत्त कॉलनी येथील रहिवासी गोपाल पाटील (वय 66) व त्यांचा मुलगा खेमा गोपाल पाटील(वय 35 )दुचाकी क्रमांक एमएच 19 बिडी 5442 वरुन दोघे आपल्या मूळ गावी चिखली येथे गेले होते. तेथून ते शनिवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास फैजपुर शहरात परतत असतांना भुसावळ-फैजपूर रस्त्याच्या जवळील पिंपरुड फाट्याजवळ एका अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली. या अपघातात गोपाळ पाटील हे जागीच ठार झाले. तर खेमा पाटील हा गंभीर जखमी झाला.अपघाताचे वृत्त कळताच फैजपूर येथील भरत अरोरा व अमोल चौधरी, सुधाकर चौधरी, विकी जैस्वाल, मुकेश मेढे, समर्थ सोनार,मुकेश हिवरे ,संदीप तायडे पराग सराफ यांच्यासह नागरिकांनी धाव घेतली.गंभीर जखमी असलेल्या खेमा पाटील याला अमोल चौधरी यांनी आपल्या अॅम्बुलन्स मध्ये टाकून उपचारासाठी तातडीने जळगाव येथे नेले मात्र उपचार सुरू होण्यापूर्वी तो मृत्यू पावला त्याला तेथील डॉक्टरांनी मृत घोषित केले.याप्रकरणी फैजपुर पोलिसात अज्ञात वाहनधारका विरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल झाला असून, पुढील तपास सहाय्यक निरीक्षक प्रकाश वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे करीत आहे.

Comments

Popular posts from this blog

खान्देश नारीशक्ती चा राज्यस्तरीय नारीदिप सन्मान पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

होय आम्ही शिकणार.. संघर्ष करणार - चाळीसगाव येथील स्व.रामराव जिभाऊ पाटील शिष्यवृत्ती प्राप्त ४२५ विद्यार्थ्यांनी केला निर्धार ; आ.मंगेश चव्हाण यांचे शैक्षणिक दातृत्व