आ.मंगेश चव्हाण व शेतकऱ्यांना पुर्ण समर्थन- माजी पालकमंत्री आ.गिरीशभाऊ महाजन

आ.मंगेश चव्हाण व शेतकऱ्यांना पुर्ण समर्थन- माजी पालकमंत्री आ.गिरीशभाऊ महाजन

  संदिप पाटील जळगाव: चाळीसगाव येथील आ.मंगेश चव्हाण यांच्यासह तीस शेतकऱ्यांवर पोलीसांनी गुन्हे दाखल करुन ४-५ दिवसांपासून त्यांना जेलमध्ये डांबून ठेवले आहे.हा अत्यंत गंभीर व संतापजनक प्रकार असून आधिच कोरोनामुळे शेतकरी बेजार झाला आहे त्यातच अवकाळी पाऊस,वादळ यामुळे मोठ्या प्रमाणावर शेतीचे नुकसान झाले आहे.उन्हाळा असल्याने शेतकऱ्यांचे पिक अंतिम टप्प्यात असून अचानक विज वितरण कंपनीने शेतकऱ्यांच्या शेतातील विज कनेक्शन कट करुन एक प्रकारे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम शासनाने केले असून याविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना व आ.मंगेश चव्हाण यांना या सरकारने जेलमध्ये टाकून शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला आहे.मी व भारतीय जनता पार्टी आ.मंगेश चव्हाण व शेतकऱ्यांसोबत असून आज त्यांची भेट घेऊन चर्चा केली आहे असं माजी मंत्री आ.गिरीश महाजन म्हणाले.
         माजी मंत्री आ.गिरीश महाजन हे कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर गेले १० दिवस उपचार घेतल्यानंतर दि.३० मार्च रोजी घरी आले. जळगावात परतले असता लगेचच त्यांनी कामाला सुरुवात केली व दि.३० रोजी जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयास भेट देऊन पाहणी केली त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना विविध विषयांवर रोखठोक भुमिका व्यक्त केली.

Comments

Popular posts from this blog

खान्देश नारीशक्ती चा राज्यस्तरीय नारीदिप सन्मान पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

होय आम्ही शिकणार.. संघर्ष करणार - चाळीसगाव येथील स्व.रामराव जिभाऊ पाटील शिष्यवृत्ती प्राप्त ४२५ विद्यार्थ्यांनी केला निर्धार ; आ.मंगेश चव्हाण यांचे शैक्षणिक दातृत्व