धक्कादायक... ज्वारी पिकाला दाणेच आले नाहीत?आ.मंगेशदादा चव्हाण अधिकार्यांसह रात्री शेतात

हायटेक कंपनीच्या ज्वारीला दाणेच आले नाहीत? आ.मंगेश चव्हाणांनी रात्री कृषी अधिकाऱ्यांना नेले शेतात

संदिप पाटील चाळीसगाव : हायटेक कंपनीच्या ३२०६ ज्वारी पिकाच्या बियाण्यामुळे चाळीसगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिकाला दाणेच न लागल्याने मोठे आर्थिक नुकसान झाल्याने आज कृषी अधिकारी, कृषी केंद्र चालक व शेतकऱ्यांसह आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी रात्री ०८ वाजेच्या दरम्यान शेतात जाऊन पिकांची पाहणी केली.
     चाळीसगाव तालुक्यातील खरजई,तरवाडे,बोरखेडा सहीत अनेक गावांमध्ये शेकडो एकर जमीनीवर शेतकऱ्यांनी हैदराबाद येथील हायटेक कंपनीच्या ३२०६ या ज्वारी बियाण्याची पेरणी केली होती.परंतू सदर ज्वारी च्या पिकाला दाणेच आले नसल्याने शेतकऱ्यांची फसवणूक झाली असल्याचे शेतकऱ्यांच्या लक्षात आल्यावर शेतकऱ्यांनी लगेचच आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या कडे यासंदर्भात तक्रार केली.
        आमदार मंगेशदादा चव्हाण यांना माहिती मिळताच संध्याकाळी साडेसात वाजता अंधार पडला होता तरीही आमदारांनी संबंधित कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना, व्यापार्यांना तसेच कृषी केंद्र चालकांना सोबत घेऊन खरजई येथील तक्रारदार शेतकऱ्यांचे शेत गाठून सर्व ज्वारी पिकाची पाहणी केली.त्याचप्रमाणे. संबंधित वरिष्ठ अधिकारींशी शेतातूनच फोनवरून संपर्क साधून संबंधित हायटेक कंपनीच्या विरोधात योग्य ती तत्काळ कारवाई करुन गुन्हे दाखल करावेत व ज्या शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे त्यांना त्वरित नुकसान भरपाई द्यावी अशी कडक शब्दांत सुचना केली. 
       शेतकऱ्यांच्या पिकाच्या देठालाही हात लावू नका असा जाहीरनामा असणार्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात शेतकऱ्यांची अशी क्रूर चेष्टा होत असेल तर आम्ही धडा शिकवल्या शिवाय गप्प बसणार नाही मग त्यामध्ये दोषी कृषी मंत्री असोत किंवा कोणीही अधिकारी असोत या नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मी कटिबध्द आहे असे यावेळी आ.मंगेशदादा चव्हाण यांनी खान्देश न्युज नेटवर्क सोबत बोलतांना सांगितले.

Comments

Popular posts from this blog

खान्देश नारीशक्ती चा राज्यस्तरीय नारीदिप सन्मान पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

होय आम्ही शिकणार.. संघर्ष करणार - चाळीसगाव येथील स्व.रामराव जिभाऊ पाटील शिष्यवृत्ती प्राप्त ४२५ विद्यार्थ्यांनी केला निर्धार ; आ.मंगेश चव्हाण यांचे शैक्षणिक दातृत्व