जळगाव जिल्ह्यातील 'या दोन' शहरांमध्ये दोन दिवस जनता कर्फ्यु???

जळगाव जिल्ह्यातील 'या दोन' शहरांमध्ये दोन दिवस जनता कर्फ्यु???
चाळीसगाव आणि चोपडा नगरपरिषद हद्दित १३ व १४ मार्च रोजी कडक निर्बंध

जळगाव प्रतिनिधी: जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी साथ रोग प्रतिबंधात्मक कायदा, 1897 व आपत्ती व्यवस्थापन कायदा, 2005 अन्वये मिळालेल्या अधिकाराचा वापर करुन १४ मार्च रोजी चाळीसगाव , 
चोपडा सह जिल्ह्यातील नगरपरिषदांच्या हद्दीत दोन दिवसांसाठी निर्बंध आदेश आज पारित केले आहे.
   सार्वजनिक आरोग्य मंत्रालय यांचे 14 मार्च, 2020 रोजीच्या पत्रानुसार राज्यात साथ रोग प्रतिबंधात्मक कायदा, 1897 लागू झाला आहे प्रत्येक जिल्ह्याचे जिल्हाधिकारी त्यांचे कार्यक्षेत्रात कोव्हिड 19 नियंत्रणासाठी सक्षम प्राधिकारी आहेत. मुख्यमंत्री यांनीही 16 फेब्रुवारी रोजी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे उपाययोजनांचे निर्देश दिलेले आहेत.

पुढिल गोष्टींना लागू राहतील निर्बंध
         जळगांव जिल्हयातील चोपडा, चाळीसगांव व अमळनेर इत्यादी नगरपालिकांच्या हद्दीत निर्बंध लागू करणे आवश्यक असल्याने जिल्हयातीन चोपडा व चाळीसगांव या नगरपालिका हद्दीत 13 मार्च रोजीच्या मध्यरात्रीपासून 14 मार्च रोजीच्या मध्यरात्रीपर्यंत निर्बंध लागू करण्यात येत आहेत त्यानुसार सर्व बाजारपेठा, आठवडी बाजार बंद राहतील. किराणा दुकाने, अत्यावश्यक नसलेली इतर सर्व दुकाने बंद राहतील. किरकोळ भाजीपाला / फळे रखरेदी-विक्री केंद्रे बंद राहतील. शैक्षणिक संस्था/शाळा / महाविद्यालय, खाजगी कार्यालये बंद राहलील, हॉटेल / रेस्टॉरेंट ( होम डिलीव्हरी, पार्सल वगळता ) बंद राहतील. सभा / मेळावे/चेठका / धार्मिक स्थळे, सांस्कृतिक / धार्मिक व तत्सम कार्यक्रम बंद राहतील. शॉपींग मॉल्स / मार्केट, बार्बर शॉप, स्पा, सलून, लिकर शॉप बंद राहतील. गार्डन, पार्क, बगीचे सिनेमागृहे, नाट्यगृहे, व्यायामशाळा, जलतरण तलाव प्रेक्षकगृहे, क्रिडा स्पर्धा, प्रदर्शने, मेळावे, संमेलन बंद राहतील. पानटपरी, हातगाडी, खाद्यपदार्थ विक्रीची ठिकाणे बंद राहतील. 

यांना राहिल निर्बंधातून सूट
   या बंधनातून दुध विक्री केंद्रे,वैद्यकीय उपचार व सेवा,मेडीकल स्टोअर्स, अम्ब्युलन्स सेवा, आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित घटक" यांना सुट देण्यात आली आहे. 13 व 14 मार्चरोजी पूर्व नियोजित परिक्षा असल्यास परीक्षार्थी व परिक्षेकरीता नेमण्यात आलेल्या अधिकारी /कर्मचारी यांना या निर्बधातून सुट राहील.या निर्बंधांचे पालन करण्याची जबाबदारी संयुक्तिकरीत्या पोलीस विभाग व संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था यांची राहील.

Comments

Popular posts from this blog

खान्देश नारीशक्ती चा राज्यस्तरीय नारीदिप सन्मान पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

होय आम्ही शिकणार.. संघर्ष करणार - चाळीसगाव येथील स्व.रामराव जिभाऊ पाटील शिष्यवृत्ती प्राप्त ४२५ विद्यार्थ्यांनी केला निर्धार ; आ.मंगेश चव्हाण यांचे शैक्षणिक दातृत्व