राज्यस्तरीय खान्देश कन्या नारी गौरव,नारी रत्न,नारीदिप व जीवन गौरव पुरस्कारांची झाली घोषणा

राज्यस्तरीय खान्देश कन्या नारी गौरव,नारी रत्न व नारीदिप पुरस्कारांची झाली घोषणा
विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा होणार सन्मान

जळगाव प्रतिनिधी: खान्देश जनसेवा फाऊंडेशन व खान्देश न्युज नेटवर्क यांच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त राज्यस्तरीय पुरस्कारासाठी नामांकन मागविण्यात आले होते.काल या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे.राज्यस्तरीय नारी रत्न जीवन गौरव पुरस्कार खिरोदा येथील सौ.प्रतिभा तुकाराम बोरोले यांना जाहीर झाला आहे.
     खान्देश कन्या राज्यस्तरीय नारी गौरव पुरस्कारासाठी भुसावळ येथील रहिवासी व सध्या कतार या देशात व्यास्तव्यास असलेल्या प्रा.डॉ.अरुणा धाडे,बामणोद येथील रहिवासी व मोहमांडली या आदिवासी भागात आरोग्य सेवा देणाऱ्या आरोग्य सेविका श्रीमती पल्लवी पुरुषोत्तम भारंबे तसेच रावेर पंचायत समितीच्या सदस्या व सामाजिक कार्यकर्त्या सौ.योगिता रामदास वानखेडे यांना जाहीर झाला असून राज्यस्तरीय नारीरत्न सन्मान पुरस्कार स्मार्ट ग्राम चिनावलच्या लोकनियुक्त महिला सरपंच सौ.भावना योगेश बोरोले,भादली केंद्राच्या केंद्रप्रमुख, शिक्षिका श्रीमती वैशाली रमेश बाविस्कर तसेच नशिराबाद येथील रहिवासी व सध्या नाशिक येथे वास्तव्यास असलेल्या व मिशन रेड अलर्ट या अभियानाच्या प्रमुख सौ.दिपा प्रमोद येवले यांना जाहीर झाला आहे.
         त्याचप्रमाणे राज्यस्तरीय नारिदिप सन्मान पुरस्कार साठी आदर्श शिक्षिका ज्योती राणे जळगाव, उपक्रमशील शिक्षिका अश्विनी योगेश कोळी फैजपूर, पत्रकार व संपादिका प्रा.जयश्री दाभाडे साळुंके अमळनेर, सामाजिक कार्यकर्त्या सौ.मनिषा बेंडाळे ऐरोली, जागतिक विक्रमाची कामगिरी करणाऱ्या अॅड.जया उभे पुणे, महिला पोलीस पाटील सौ.रहिसा सलीम तडवी जानोरी, सामाजिक कार्यकर्त्या रुबीना अन्वर पटेल नांदुरा बुलढाणा, सामाजिक कार्यकर्त्या सौ.संगिता प्रमोद पाटील पालघर, जळगाव येथील शिक्षिका सौ.मोनिका विजय चौधरी,सौ.ललिता नितीन पाटील, चाळीसगाव येथील शिक्षिका सौ.सुवर्णा राजपूत, रावेर येथील उर्दू शिक्षिका गज़ाला तबस्सुम सैय्यद असगर अली,हेल्थ प्लस च्या संचालिका भारती रविंद्र काळे,नोबल इंटरनॅशनल च्या संचालिका सौ.अर्चना प्रशांत सुर्यवंशी,कानळदा येथील उपक्रमशील शिक्षिका सौ.छाया अजय पाटील,चिखली ता.यावल येथील सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती ज्योती किशोर देवरे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.
      सध्या कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता हि परिस्थिती पुर्वपदावर आल्यावर व प्रशासनाच्या परवानगीने लवकरच जळगाव येथे मान्यवरांच्या उपस्थितीत जाहीर कार्यक्रमात सर्व पुरस्कारार्थींना सन्मानित करण्यात येणार आहे.

Comments

Popular posts from this blog

खान्देश नारीशक्ती चा राज्यस्तरीय नारीदिप सन्मान पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

होय आम्ही शिकणार.. संघर्ष करणार - चाळीसगाव येथील स्व.रामराव जिभाऊ पाटील शिष्यवृत्ती प्राप्त ४२५ विद्यार्थ्यांनी केला निर्धार ; आ.मंगेश चव्हाण यांचे शैक्षणिक दातृत्व