जिल्हा परिषद अध्यक्षा कोरोना पॉझिटिव्ह,लक्षणे मात्र सौम्य
जळगाव प्रतिनिधी: जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असुन आज जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ.रंजना प्रल्हाद पाटील यांचादेखील रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.त्यांना सध्या सौम्य लक्षणे असून त्यांच्यावर घरीच उपचार प्रारंभ करण्यात आले आहेत.
"गेल्या ४-५ दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी खबरदारी चा उपाय म्हणून कोरोना चाचणी करुन घ्यावी" असे आवाहन यावेळी जि.प.अध्यक्षा सौ.रंजना पाटील यांनी केले आहे.
आज दिवसभरात...
दरम्यान आज दिवसभरात जिल्ह्यात ४५७६ जणांची तपासणी करण्यात आली असून आज एकुण ९८२ जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत तर ५१२ रुग्ण आज कोरोनामुक्त झाले आहेत.
Comments
Post a Comment