राज्यात 1 मे पासून लसीकरण होणार नाही, राजेश टोपे यांची माहिती
राज्याला मोठ्या प्रमाणावर लस उपलब्ध होणार नाहीत. त्यामुळे 1 मे पासून राज्यात लसीकरण सुरू होणार नाही. खान्देश न्यूज नेटवर्क: राज्याला मोठ्या प्रमाणावर लस उपलब्ध होणार नाहीत. त्यामुळे 1 मे पासून राज्यात 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचं मोफत लसीकरण सुरू होणार नाही, असं राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे येत्या 1 मे रोजी राज्यातील 18 वर्षांवरील व्यक्तींचं लसीकरण होणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतर राजेश टोपे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. राज्यात सर्वांचं मोफत लसीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र लगेच मोठ्या प्रमाणावर लस मिळणार नसल्याने राज्यात 1 मे रोजी लसीकरण करण्यात येणार नाही. मे अखेरीपर्यंत व्हॅक्सीन मिळाली तर लसीकरण करता येईल, असं सांगतानाच लसीकरणासाठी वयोगटाचे टप्पे करण्याचा विचार सुरू आहे. त्यानुषंगाने प्रत्येकाला लस मिळेल. तसेच येत्या सहा महिन्यात हे लसीकरण पूर्ण करण्याचा आमचा संकल्प आहे, असं टोपे यांनी सांगितलं. अपॉईंटमेंट सक्तीची लसीकरण करण्यासाठ...