भाजपा आमदार मंगेश चव्हाण यांच्याविषयी सोशल मीडियावर बदनामीकारक मजकूराने खळबळ

भाजपा आमदार मंगेश चव्हाण यांच्याविषयी सोशल मीडियावर बदनामीकारक मजकूराने खळबळ

यानिमित्ताने भाजपाचे अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्याची चर्चा?

खान्देश न्यूज नेटवर्क : चाळीसगाव विधानसभा मतदारसंघाचे भाजपाचे आमदार मंगेश चव्हाण यांनी गेल्या आठवड्यात वीज वितरण कंपनीच्या विरोधात शेतकरी हितासाठी आक्रमक आंदोलन केले.त्यामुळे आ.चव्हाण यांच्यासह ३१ शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांना अट्टल गुन्हेगारांसारखी वागणूक मिळत असल्याचे सांगण्यात येत आहे.
      या सर्व घटनाक्रमानंतर सत्ताधारी महाविकास आघाडीच्या जिल्ह्यातील नेत्यांकडून आ.मंगेश चव्हाण यांच्यावर टीका होईल अशी अपेक्षा असतांना झाले मात्र उलटेच.सदर शेतकरी आंदोलनामुळे आ.चव्हाण यांना शेतकरी वर्गाकडून जिल्हाभरातून तसेच राज्यातील विविध ठिकाणांहून उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे.यामुळे विरोधकांनी देखील आ.मंगेश चव्हाणांवर टिका टिप्पणी करणे टाळले आहे.
     काल मात्र वेगळेच चित्र पहावयास मिळाले असून सोशल मीडिया वर काही कार्यकर्त्यांकडून आ.मंगेश चव्हाण यांच्या विरोधात बदनामीकारक मजकूर सोशल मीडिया वर शेअर केला जात असून आमदार मंगेश चव्हाण यांनी केलेले हे कृत्य कुठलेही आंदोलन नसून अमानवीय कृत्य आहे व स्वताच्या प्रसिद्धी साठी केलेले गुंडगिरी चे हिंसक प्रदर्शन आहे.आ.चव्हाण व त्यांच्यासोबत अटकेत असलेल्या गुंडांना देखील चड्डी पिवळी होईपर्यंत मारलं पाहिजे इतकं घाणेरडे कृत्य त्यांनी केले आहे.अशा प्रकारचा बदनामीकारक व अभद्र भाषेतील मजकूर सोशल मीडिया वर टाकून आ.चव्हाण व शेतकऱ्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला गेला आहे.

आ.चव्हाण व खा.पाटील समर्थकांची तुतु-मैमै

    दरम्यान यासंदर्भात आ.चव्हाण समर्थकांनी खासदार उन्मेष पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी हे काम केले असल्याचे प्रथमदर्शनी दिसत असल्याचे सांगितले असून सदर विश्वंभर जगताप नावाचे फेसबुक अकाऊंट हे खा.उन्मेष पाटील यांच्या पत्नी संपदा पाटील यांच्या नावात बदल करुन तयार करण्यात आल्याचे सांगितले आहे.मात्र हे आरोप खोटे असून आ.चव्हाण यांचे समर्थक नाहक खासदार उन्मेष पाटील यांची बदनामी करत असून तत्काळ खा.पाटील यांची बदनामी थांबवली नाही तर आम्ही मानहानी चा गुन्हा दाखल करु असे खा.पाटील यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी सोशल मीडिया वर प्रसिद्ध केले आहे.
       सदर प्रकार अतिशय निंदनीय असून गोरगरीब शेतकऱ्यांच्या हितासाठी आंदोलन करणाऱ्या आ.मंगेश चव्हाण यांची नाहक बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात आहे या घृणास्पद प्रकारची सायबर सेल कडून सखोल चौकशी करून कारवाई करण्यात यावी अशी चर्चा तालुक्यात सर्वत्र होतांना दिसत आहे.

Comments

Popular posts from this blog

खान्देश नारीशक्ती चा राज्यस्तरीय नारीदिप सन्मान पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

होय आम्ही शिकणार.. संघर्ष करणार - चाळीसगाव येथील स्व.रामराव जिभाऊ पाटील शिष्यवृत्ती प्राप्त ४२५ विद्यार्थ्यांनी केला निर्धार ; आ.मंगेश चव्हाण यांचे शैक्षणिक दातृत्व