चाळीसगावी गुजरात अंबुजा एक्सपोर्ट लि. उभारणार प्राणवायू निर्मिती प्रकल्प
यापूर्वी देखील चाळीसगाव ट्रामा केअर सेंटर ला गुजरात अंबुजा एक्स्पोर्ट कंपनीने 10 बेड, 10 मेटरेस, 10 आयसीयु मोनिटर, व 4 ऑक्सिजन स्वनिर्मित मशीन वितरित केलेल्या आहेत.
संदिप पाटील चाळीसगाव:कोरोना महामारी च्या वाढत्या पार्श्वभूमीवर सध्या चाळीसगाव शहरासाठी इतर जिल्ह्यांतून तसेच विविध राज्यांतून ऑक्सिजन चा पुरवठा करण्यात येत आहे पण मागणी वाढल्याने कोरोना रुग्णांना ऑक्सीजन कमी पडू नये यासाठी चाळीसगाव (खडकी) एम.आय.डी.सी.येथील गुजरात अंबुजा एक्सपोर्ट लिमिटेड कंपनी ने स्वतःहून पुढाकार घेत ऑक्सिजनचा पुरवठा कायम स्वरूपी होण्याकरिता चाळीसगाव येथील नवीनच असलेल्या ट्रामा केअर केंद्र आवारात ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प युनिट उभारून देणार आहे.
प्लांटची ऑक्सिजन निर्मिती क्षमता ही 210 लिटर पर मिनिट इतकी राहणार असून 50 ते 60 रुग्णांकरिता नियमितपणे ऑक्सिजनचा पुरवठा होणार आहे. यापूर्वी देखील चाळीसगाव ट्रामा केअर केंद्राला गुजरात अंबुजा एक्स्पोर्ट कंपनी व्यवस्थापनाने 10 बेड, 10 मेटरेस, 10 आयसीयु मोनिटर, व 4 ऑक्सिजन स्वनिर्मित {02 concentrator } मशीन वितरित केलेल्या आहेत. चाळीसगाव प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत गुजरात अंबुजा एक्स्पोर्ट लिमिटेडच्या व्यवस्थापनाने बुधवार दि 21 रोजी ट्रामा केअर केंद्र परिसरातील जागेची पाहणी करून युद्धपातळीवर काम पूर्ण कसे करता येईल यासाठी भेट दिली असून लवकरच काम देखील सुरू करण्यात येणार असल्याचे गुजरात अंबुजा एक्स्पोर्ट लिमिटेडच्या व्यवस्थापनाने प्रसिद्धपत्रका द्वारे कळविण्यात आले आहे.
श्रेया घेण्यावरुन राजकारण तापले
दरम्यान गुजरात अंबुजा एक्सपोर्ट लिमिटेड कंपनी आपल्या सिएसआर फंडातून हा प्रकल्प उभारणार आहे पण चाळीसगावात मात्र या प्रकल्पाचे काम सुरू होण्यापूर्वीच श्रेय घेण्यासाठी चढाओढ पाहण्यास मिळत असल्याने हा आॅक्सीजन प्रकल्प चर्चेचा विषय ठरला आहे.विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते हा प्रकल्प होण्यासाठी आपल्या नेत्यांनीच कसा प्रयत्न केला आहे हे सांगण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत.
Comments
Post a Comment