फैजपूर येथील रहिवासी व कोचूर जि.प.शाळेच्या उपक्रमशील शिक्षिका स्मिता चौधरी यांचे दुःखद निधन
फैजपूर प्रतिनिधी: फैजपूर येथील रहिवासी व कोचूर जिल्हा परिषद शाळेच्या उपक्रमशील शिक्षिका स्मिता सचिन चौधरी यांचे कोरोनाचे उपचार सुरू असताना दुःखद निधन झाले.चौधरी कुटुंबात २२ दिवसांपूर्वी सासरे,माजी सैनिक हेमचंद्र नामदेव चौधरी यांचे निधन झाले व लागोपाठ त्यांच्या सुन स्मिता चौधरी यांचेदेखील निधन झाल्याने चौधरी व राणे परीवारावर दुःखाचा डोंगर कोसळा आहे.
स्व.स्मिता चौधरी ह्या सेवानिवृत्त मुख्याध्यापिका सौ.आशा सुरेश राणे यांच्या कन्या तर वरणगाव आयुध निर्माणी चे कर्मचारी सचिन चौधरी यांच्या पत्नी होत्या.फैजपूर येथील सामाजिक कार्यकर्त्या व खान्देश नारीशक्ती अध्यक्षा दिपाली चौधरी झोपे यांच्या त्या आतेबहीण होत.स्मिता यांचा शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक व वैज्ञानिक या विषयांचा गाढा अभ्यास होता त्यामुळे विविध क्षेत्रातील महिला वेगवेगळ्या विषयांवर मार्गदर्शन घेण्यासाठी त्यांची भेट घेत असत.त्यांच्या गोड व मनमिळाऊ स्वभावामुळे थोड्याच वर्षांत त्यांनी नावलौकिक मिळविला होता.आपल्या आईकडून मिळालेला ज्ञानदानाचा वारसा पुढे चालवत विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून विद्यार्थ्यांमधे शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी यासाठी स्मिता चौधरी नेहमीच प्रयत्नशील होत्या.
१५ दिवसांपूर्वी स्मिता यांना कोरोनाचे सौम्य लक्षणे आढळून आले होते त्यानंतर त्यांनी लगेचच डॉक्टरांकडे जाऊन तपासणी केली असता त्यांची टेस्ट पाॅझिटिव्ह आल्याने त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते पण अखेर डॉक्टरांना अपयश आले व स्मिता चौधरी यांची प्राणज्योत मालवली.त्यांच्या पश्चात पती सचिन चौधरी, मुलगी योशिता व बालवयातच विविध विक्रम नोंदविणारा चिमुकला पारस असा परिवार असून या घटनेनंतर फैजपूर व पंचक्रोशीत सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
Comments
Post a Comment