अखेर राज्यात लॉकडाऊन जाहिर: बुधवारी रात्री 8 वाजेपासून कलम 144 लागू होणार

*बुधवारपासून 15 दिवस महाराष्ट्रात संचारबंदी, *काय सुरु, काय बंद राहणार?
*मुख्यमंत्र्यांकडून 5400 कोटींच्या पॅकेजची घोषणा;
*घरेलू कामगारांपासून ते रिक्षा चालकांपर्यंत मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, बघा कुणाला किती पैसा मिळणार?

खान्देश न्यूज नेटवर्क: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी नागरिकांना राज्यातील कोरोनाची माहिती देताना उपाययोजनांचेही तपशील सांगितले. तसेच बुधवारी (14 एप्रिल) रात्री 8 वाजल्यापासून 15 दिवस राज्यभर संचारबंदी लागू असणार आहे, अशी घोषणा केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी अनेक घोषणा केल्या. त्या पुढीलप्रमाणे,

महत्वाचे १० मुद्दे-

1. 100 टक्के ऑक्सिजनचा उपयोग वैद्यकीय कारणांसाठी होणार. सध्या महाराष्ट्रात 950-1000 टन ऑक्सिजनचं उत्पन्न होतं.

2. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील इतर राज्यांमधूनही ऑक्सिजन आणण्याची परवानगी दिली. रस्त्याने ऑक्सिजन आणताना लष्कराच्या, वायू दलाच्या मदतीने हवाई मार्गाने ऑक्सिजन आणण्यासाठी परवानगी द्यावी आणि व्यवस्था करावी अशी मागणी पंतप्रधानांकडे करणार आहे.

3. मार्चमध्ये जीएसटीची मर्यादा असते ती आणखी 3 महिन्यांनी वाढवण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार. उद्योगधंदे राहिले पाहिजे, तरच रोजीरोटी राहिल.

4. या काळात रोजीरोटी गेली त्यांना व्यक्तिगत मदत करण्यासाठी पंतप्रधान मोदींकडे मागणी करणार.

5. रेमडेसिव्हिर इंजेक्शन कमी पडू देणार नाही.

6. रुग्णवाढ भयावह आहे. ऑक्सिजनचा खूप उपयोग करावा लागतोय कारण रुग्ण वाढलेत. त्यामुळे ऑक्सिजन तुटवडा होतोय.

7. नव्याने उत्तीर्ण होणाऱ्या वैद्यकीय विद्यार्थ्यांना उपचाराच्या कामात सहभागी होण्याचं आवाहन. निवृत्त डॉक्टरांनीही या लढाईत सहभागी व्हावं.
Advertisement-
8. एकदम लॉकडाऊन लावणार नाही, पण त्यासारखे काही निर्बंध लावावे लागतील. बुधवारी (14 एप्रिल) रात्री 8 वाजल्यापासून कडक निर्बंध लागू करण्यात येणार. याला केवळ पंढरपूर-मंगळवेढा काही दिवसांसाठी अपवाद असेल.

9. 14 एप्रिल सायंकाळपासून राज्यभरात ब्रेक द चेन अंतर्गत कलम 144 लागू करत संचारबंदी होणार. अनावश्यक प्रवास बंद करावा लागणार. योग्य कारणाशिवाय घराबाहेर पडता येणार नाही.

10. सकाळी 7 ते रात्री 8 या वेळेत अत्यावश्यक सेवा चालू असतील. लोकल आणि बससेवा बंद करणार नाही. जीवनावश्यक कर्मचाऱ्यांना प्रवासासाठी व्यवस्था ठेवणार.

या काळात काय सुरु आणि काय बंद राहणार ?

उद्या संध्याकाळपासून ‘ब्रेक द चेन’

अनावश्यक कारणांसाठी नागरिकांचं बाहेर फिरणं पूर्णपणे बंद असणार

सार्वजनिक वाहतूक सुरु राहणार
सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद होणार नाही. त्या अत्यावश्यक कामांसाठीच वापरल्या जातील. अत्यावश्यक सेवा देणाऱ्या लोकांच्या प्रवासासाठी त्या सुरु ठेवण्यात येतील. त्यामध्ये रुग्णालय, वैद्यकीय सेवा, वाहतूक सप्लाय चेन, लस उत्पादक आणि वाहतूक करणारे, मास्क, जंतूनाशक उत्पादक आणि वितरक, वैद्यकीय कच्चा माल निर्मिती करणारे कर्मचारी, जनावरांचे दवाखान्यातील कर्मचारी, शितगृहे, वेअर हाऊसिंग, बस, ऑटो, विविध देशांची राजनैतिक कार्यालये, पावसाळी कामे सुरु राहतील, सर्व बँका, सेबी, सेबीने मान्यता दिलेली कार्यालये, दूरसंचार सेवा, ई-कॉमर्स, अधिस्विकृतीधारक पत्रकार, पेट्रोल पंप सुरु राहतील, शासकीय आणि खासगी सुरक्षा मंडळे, आयटी सेवा सुरु राहतील

उद्योजकांनो.. शक्य असेल तर कर्मचाऱ्यांची व्यवस्था करा

बांधकाम, अन्य उद्योगांना सांगतो की, तुमच्या साईट्सवर शक्य असेल तर तिथेच तुमच्या कर्मचाऱ्यांची सोय करा, त्यांच्या आरोग्याची खबरदारी घ्या. तुमच्या कँम्पसमध्ये सुविधा नसतील तर कर्मचाऱ्यांच्या वाहतुकीची व्यवस्था करण्याचं आवाहन

हॉटेल्स, रेस्टॉरंट्सची होम डिलिव्हरी, टेक अवे सेवा सुरु

हॉटेल्स रेस्टॉरंट्सवर पुर्वीप्रमाणेच निर्बंध, टेक अवे, होम डिलिव्हरी सेवा सुरु राहतील. रस्त्यावरील खाद्य विक्रेत्यांनाही परवानगीय. पण त्यांनीही पार्सल व्यवस्थाच सुरु ठेवावी.

मुख्यमंत्र्यांकडून 5400 कोटींच्या पॅकेजची घोषणा; 

3 किलो गहू, 2 किलो तांदूळ महिनाभर मोफत

शिवभोजन थाळीही महिनाभर मोफत देणार आहे. 

सरकारी योजनेचे नोंदणीकृत लाभार्थ्यांना प्रत्येकी 1 हजार रुपये देणार

नोंदणीकृत बांधकाम कामगारांना प्रत्येकी १५०० रुपये देण्यात येणार आहे.

अधिकृत फेरिवाल्यांनाही दीड हजार रुपये देणार आहे.

परवानाधारक रिक्षाचलाकांनीही १५०० रुपये,

खावटी योजनेचा लाभ घेणाऱ्या आदिवासींनाही 2 हजार रुपये देण्यात येणार

नोंदणीकृत घरेलू कामगारांनाही आर्थिक मदत देण्यात येणार

कोविड संदर्भातील सुविधा उभारणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना अतिरिक्त निधी 330 कोटी कोविडसाठी बाजूला काढून ठेवत आहोत. 

लष्कराच्या मदतीने हवाईमार्गे ऑक्सिजन आणणार

पंतप्रधानांशी माझी नुकतीच बैठक झाली आहे. त्यात त्यांना ऑक्सिजनची मागणी केली आहे. इतर राज्यातून ऑक्सिजन आणण्याची परवानगी देण्याची मागणी त्यांच्याकडे केला आहे. त्यांनी परवानगीही दिली आहे. मात्र, ईशान्येकडील राज्यातून ऑक्सिजन आणण्याची परवानगी देण्यात आली आहे. दररोज हजारो किलोमीटरचा प्रवास करून रस्ते मार्गे हे ऑक्सिजन आणावं लागणार आहे. परंतु आपल्याला ऑक्सिजनची खूप गरज आहे. त्यामुळे रस्तेमार्गे ऑक्सिजन आणणं परवडणारं नाही. त्यामुळे लष्कराच्या मदतीने हवाईमार्गे ऑक्सिजन आणण्याची पंतप्रधानांनी परवानगी द्यावी. मी फेसबुकवरून तुमच्या माध्यमातून पंतप्रधानांना आवाहन करत आहे. आणि त्यांना पत्र लिहूनही मागणी करणार आहे, असं मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.

15 दिवस कडक संचारबंदी

राज्यात कोरोनाचा कहर वाढल्याने उद्यापासून राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. उद्यापासून रात्री 8 वाजल्यापासून संचारबंदी लागू करण्यात येणार आहे. 15 दिवस ही संचारबंदी राहणार आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं. तसेच या संचारबंदीतून अत्यावश्यक सुविधा वगळण्यात आल्या असल्याचंही त्यांनी सांगितलं.
Advertisement

Comments

Popular posts from this blog

खान्देश नारीशक्ती चा राज्यस्तरीय नारीदिप सन्मान पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

होय आम्ही शिकणार.. संघर्ष करणार - चाळीसगाव येथील स्व.रामराव जिभाऊ पाटील शिष्यवृत्ती प्राप्त ४२५ विद्यार्थ्यांनी केला निर्धार ; आ.मंगेश चव्हाण यांचे शैक्षणिक दातृत्व