शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करणार्या सरकारचं तेरावे करून मुंडन करणार-आ.मंगेश चव्हाण,आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह सर्व शेतकऱ्यांची जामिनावर सुटका
शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करणार्या सरकारचं तेरावे करून मुंडन करणार-आ.मंगेश चव्हाण
आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह सर्व शेतकऱ्यांची जामिनावर सुटका
संदिप पाटील चाळीसगाव: शेतकऱ्यांच्या न्यायासाठी आपले आंदोलन अजून तीव्र करणार असून १२ दिवस अटकेत राहिल्यानंतर आता १३व्या दिवशी आपण शेतकऱ्यांसह मुंडन करून सत्ताधारी सरकारचा निषेध करुन तेरावं घालणार असल्याची माहिती आमदार मंगेश चव्हाण यांनी दिली.
चाळीसगाव तालुक्यातील जवळपास सात हजार शेतकऱ्यांच्या शेतातील वीज पुरवठा खंडित केल्याबद्दल वीज वितरण कंपनीच्या अधिक्षक अभियंता यांना जाब विचारण्यासाठी गेल्यावर त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने संतप्त झालेल्या आ.मंगेश चव्हाण व शेतकऱ्यांनी महावितरणचे अधिक्षक अभियंत्याला दोरीने बांधल्याप्रकरणी आ.चव्हाण यांच्यासह शेतकऱ्यांना अटक करण्यात आली होती. काल १२ दिवसानंतर सर्वांना जामीनावर सुटका करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.
Comments
Post a Comment