सर्व किराणा दुकान सकाळी ११ वाजेपासून होणार बंद राज्यात अजून कडक निर्बंध -आरोग्यमंत्री

 महाराष्ट्रात राज्य सरकारने कडक निर्बंध लागू केले आहेत.आता त्यात सरकारने किराणा मालाच्या दुकांनांना देखील सकाळी ७ ते ११ या वेळेतच परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे.
 
याबाबत बोलताना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले,
       'लोकं किराणाच्या नावाखाली विनाकारण फिरताना दिसत आहेत. लोकांनी बिनाकामाचं फिरणे टाळले पाहिजे. त्यासाठी सकाळी ७ ते ११ या चार तासांसाठी किराणा मालाच्या दुकानांना परवानगी देण्यात आली आहे. सध्या ३० तारखेपर्यंत संचारबंदी अधिक जास्त कडक करण्याची गरज आहे.'
     अशा प्रकारचे मत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केले.यामुळे आता राज्यातील किराणा मालाची दुकाने ठराविक वेळेसाठीच उघडी राहणार आहेत.
         महाराष्ट्रात कोरोनाचा विस्फोट झाल्याने आरोग्य व्यवस्थेवर ताण पडला आहे. रेमडेसिवीर, ऑक्सिजन बेड्स, यांचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे ठाकरे सरकारने कडक निर्बंध लागू केले आहेत. या निर्बंधांतून किराणा मालाच्या दुकांनांना सूट देण्याता आली होती. मात्र त्याचा गैरफायदा घेत काही नागरिक उगाचच रस्त्यावर फिरताना आणि गर्दी करताना आढळले होते. त्यामुळे कोरोनाची साखळी तोडण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

Comments

Popular posts from this blog

खान्देश नारीशक्ती चा राज्यस्तरीय नारीदिप सन्मान पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

होय आम्ही शिकणार.. संघर्ष करणार - चाळीसगाव येथील स्व.रामराव जिभाऊ पाटील शिष्यवृत्ती प्राप्त ४२५ विद्यार्थ्यांनी केला निर्धार ; आ.मंगेश चव्हाण यांचे शैक्षणिक दातृत्व