लॉकडाऊन अटळ आहे पण हातावर पोट असणाऱ्यांसाठी काही करावं लागेल : बाळासाहेब थोरात
लॉकडाऊन शिवाय पर्याय नाही असं मला वैयक्तिक वाटते. तसं केलं नाही तर हा संसर्ग वाढत जाईल, असं बाळासाहेब थोरात यांनी नमूद केलं.
खान्देश न्यूज नेटवर्क : कोरोनाबाधित रुग्णांचे आकडे वाढत चालले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्री, विरोधक आणि तज्ज्ञांशी चर्चा केली आहे. लवकरच याबाबत निर्णय झाला पाहिजे, असे महसूलमंत्री आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात म्हणाले.ते एका खासगी वृत्तवाहिनीसोबत बोलत होते.
लॉकडाऊनमध्ये कामगारांना काय मदत द्यायची याबाबत अर्थमंत्र्यांबरोबर चर्चा केली जाईल. हातावर पोट आहे त्यांच्याकरिता काही करावं लागेल. लॉकडाऊन शिवाय पर्याय नाही असं मला वैयक्तिक वाटते. तसं केलं नाही तर हा संसर्ग वाढत जाईल, असंही थोरातांनी नमूद केलं.
आपण गेल्यावेळी दररोज 10 लाख लोकांच्या जेवणाची व्यवस्था केली. बाहेरच्या राज्यातील मजुरांची व्यवस्था केली. महाराष्ट्रात सगळ्यात जास्त चांगलं काम झालं. केंद्राने काय पॅकज दिलं आम्हाला समजलं नाही, असा आरोप थोरातांनी भाजपवर केला.
पहिली फेज आपण यशस्वी हाताळली तेव्हा महाराष्ट्रातील या सरकारचं अभिनंदन सगळ्यांनी केलं हे विसरू नये. आता दुसरी फेज आहे संसर्ग जास्त आहे, सतर्कपणे सरकार परिस्थिती हाताळत आहोत, असा दावा बाळासाहेब थोरात यांनी केला.
Advertisement
Comments
Post a Comment