आ.मंगेश चव्हाण यांच्यासह सर्व शेतकऱ्यांचा जामीन मंजूर, उद्या होणार चाळीसगावला आगमन

आ.मंगेश चव्हाण यांच्यासह सर्व शेतकऱ्यांचा जामीन मंजूर, उद्या होणार चाळीसगावला आगमन

खान्देश न्यूज नेटवर्क: चाळीसगाव तालुक्यातील जवळपास सात हजार शेतकऱ्यांच्या शेतातील वीज पुरवठा खंडित केल्याबद्दल वीज वितरण कंपनीच्या अधिक्षक अभियंता यांना जाब विचारण्यासाठी गेलेल्या आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह तीस शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करुन त्यांना अमानुषपणे तुरुंगात टाकण्यात आले होते.दरम्यान आज आमदार मंगेश चव्हाण व इतर  30 शेतकऱ्यांना जळगाव सत्र न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला असून उद्या आमदार मंगेशदादा यांच्यासह सर्व शेतकऱ्यांचे चाळीसगावात आगमन होणार असल्याचे आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या कार्यालयाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog

खान्देश नारीशक्ती चा राज्यस्तरीय नारीदिप सन्मान पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

होय आम्ही शिकणार.. संघर्ष करणार - चाळीसगाव येथील स्व.रामराव जिभाऊ पाटील शिष्यवृत्ती प्राप्त ४२५ विद्यार्थ्यांनी केला निर्धार ; आ.मंगेश चव्हाण यांचे शैक्षणिक दातृत्व