आ.मंगेश चव्हाण व शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ अलवाडी येथील प्रकाश सोनवणे या तरुणाने वाढदिवस साजरा करण्याचे केले रद्द
चाळीसगाव प्रतिनिधी: गेल्या आठवड्यात चाळीसगाव तालुक्यातील ७००० शेतकऱ्यांचा वीज पुरवठा खंडित केल्याबद्दल वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात जाब विचारण्यासाठी गेलेल्या आ.मंगेश चव्हाण यांच्यासह ३१ शेतकऱ्यांवर विविध कलमांखाली गुन्हे दाखल करुन त्यांना अमानुषपणे अटक केल्यानंतर चाळीसगाव तालुक्यासह जिल्हाभरात आ.मंगेश चव्हाण यांच्या समर्थनार्थ विविध ठिकाणी रास्तारोको आंदोलन,चुलबंद आंदोलन सह विविध पडसाद उमटले आहेत.
चाळीसगाव तालुक्यातील अलवाडी येथील रहिवासी व भाजपा सोशल मीडिया सेल तालुका उपाध्यक्ष प्रकाश सोनवणे या तरुणाने तर चक्क आपला वाढदिवस साजरा करण्याचे रद्द करुन आमदार मंगेश चव्हाण व शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.
प्रकाश सोनवणे या तरुणाने सोशल मीडियावर व्हिडिओ अपलोड करुन आ.मंगेशदादांच्या अटकेमुळे व्यतीत झालो असून या शेतकरी विरोधी महाविकास आघाडीचा निषेध करावा तेवढा कमीच असून अटकेत असलेल्या शेतकरी बांधवांसाठी व आमदार मंगेश चव्हाण यांच्या समर्थनार्थ वाढदिवस साजरा न करण्याचे आवाहन केले आहे.
Comments
Post a Comment