शेतकऱ्यांना तुरुंगात डांबणाऱ्या आघाडी सरकारचे श्राद्ध करुन आ.मंगेश चव्हाणांसह शेतकऱ्यांनी केले मुंडन

शेतकऱ्यांना तुरुंगात डांबणाऱ्या आघाडी सरकारचे श्राद्ध करुन आ.मंगेश चव्हाणांसह शेतकऱ्यांनी केले मुंडन

खान्देश न्यूज नेटवर्क: ऐन उन्हाळ्यात तापमान ४० पेक्षा जास्त असताना व हातातोंडाशी आलेल्या पिकाला शेवटचे पानी पाहिजे असतांनाच वीज कंपनीने चाळीसगाव तालुक्यातील जवळपास सात हजार शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन खंडित केल्याबद्दल न्याय मागण्यासाठी आंदोलन करण्यार्या आ.मंगेश चव्हाण यांच्यासह ३१ शेतकऱ्यांना १२ दिवस तुरुंगात डांबून ठेवण्यात आल्याबद्दल  निषेध व्यक्त करून आज सकाळी चाळीसगाव तालुक्यातील ऋषी पांथा या तिर्थक्षेत्रावर आ.चव्हाण यांच्यासह ३१ शेतकर्यांनी महाविकास आघाडी सरकारचा फोटो ठेऊन ब्राह्मणांच्या हस्ते शास्त्रोक्त पद्धतीने तेराव्या दिवसाचे श्राद्ध, पिंडदान करुन मुंडन केले.तसेच या तेराव्या दिवसाच्या श्राद्ध पिंडदान पुजेने या शेतकरी विरोधी तिघाडी सरकारच्या आत्म्यास जाग येऊन शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले जावेत अशी सामुहिक प्रार्थना करण्यात आली.
    या सरकारला जर जाग आली नाही तर लवकरच आपण शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शिंगाडे मोर्चा घेऊन मंत्र्यांच्या दालनात धडक देऊन आंदोलन करु असे प्रतिपादन यावेळी आमदार मंगेश चव्हाण यांनी केले.
      हे तिघाडी सरकार सर्वच स्तरात अपयशी ठरले असून जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा पुर्णपणे कोलमडली आहे, शेतकरी उद्ध्वस्त झाले आहेत, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे, महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे अशा परिस्थितीत कोरोनामधे होरपळणाऱ्या सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्याऐवजी हे सहकार दडपशाही करून जनतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे.याविरोधात मी एकवेळा नव्हे तर हजारो गुन्हे अंगावर घेण्याची आपली तयारी असल्याचे देखील यावेळी आ.चव्हाण  यांनी सांगितले.
        सदर मुंडन आंदोलन प्रसंगी चाळीसगाव तालुक्याचे आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह पंचायत समिती गटनेते संजय भास्करराव पाटील, नगरपालिका गटनेते संजय रतनसिंग पाटील, माजी पंचायत समिती सभापती दिनेशभाऊ बोरसे, भाजपा शहराध्यक्ष घृष्णेश्वर पाटील, युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष कपिल पाटील, माजी कृउबा सभापती सरदारसिंग राजपूत, पंचायत समिती सदस्य सुभाष पाटील, पियुष साळुंखे, अमोल चव्हाण, रोहन सूर्यवंशी, नगरसेवक बापू अहिरे, भास्कर पाटील, मनोज गोसावी, योगेश खंडेलवाल यांच्यासह आंदोलक शेतकरी व तालुक्यातील भाजपा पदाधिकारी - कार्यकर्ते उपस्थित होते.मुंडण आंदोलन स्थळी जात असताना रस्त्यात खरजई, तरवाडे, न्हावे–ढोमणे, बहाळ येथील शेतकऱ्यांनी ठिकठिकाणी आमदार मंगेश चव्हाण यांचा ताफा अडवत त्यांचा सत्कार केला.

Comments

Popular posts from this blog

खान्देश नारीशक्ती चा राज्यस्तरीय नारीदिप सन्मान पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

होय आम्ही शिकणार.. संघर्ष करणार - चाळीसगाव येथील स्व.रामराव जिभाऊ पाटील शिष्यवृत्ती प्राप्त ४२५ विद्यार्थ्यांनी केला निर्धार ; आ.मंगेश चव्हाण यांचे शैक्षणिक दातृत्व