आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या पाठपुराव्याने चाळीसगाव तालुक्यातील ६ गावांना व्यायामशाळा मंजूर,
उपखेड, खरजई, आडगाव, चितेगाव, वरखेडे बुद्रुक, खडकीसीम गावांना मिळणार प्रत्येकी ७ लक्ष निधी
सुदृढ व निरोगी पिढी घडविण्यासाठी युवाशक्तीला सकारात्मक चालना देणे गरजेचे – आमदार मंगेश चव्हाण
खान्देश न्यूज नेटवर्क चाळीसगाव: जिल्हा वार्षिक योजना सन २०२० – २१ व्यायामशाळांचा विकास या लेखाशीर्ष अंतर्गत आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या पाठपुराव्याने चाळीसगाव तालुक्यातील ६ गावांना व्यायामशाळा बांधकामासाठी निधी उपलब्ध झाला असून तशी प्रशासकीय मान्यता देखील जिल्हाधिकारी यांनी नुकतीच दिली आहे. यामुळे तालुक्यातील उपखेड, खरजई, आडगाव, चितेगाव, वरखेडे बुद्रुक, खडकीसीम या गावांना प्रत्येकी ७ लक्ष प्रमाणे एकूण ४२ लक्ष रुपये निधी मंजूर झाला आहे. यामुळे सदर गावांमध्ये सुसज्ज अशी व्यायामशाळा इमारत उभी राहणार असल्याची माहिती आमदार मंगेश चव्हाण यांनी दिली आहे.
"मी ग्रामीण भागातून आलेला तरुण असल्याने तरुणांना शारीरिक कसरतीसाठी काय अडचणी येतात हे मी जाणून आहे. तरुणांच्या शक्तीला सकारात्मक चालना देण्यासाठी व्यायामशाळा हे गावात महत्वाचे केंद्र बनावे यासाठी गावातील सुजाण नागरिकांनी एकत्र यावे, तरच निरोगी व सुदृढ भावी पिढी घडू शकते. लोकप्रतिनिधी या नात्याने जास्तीत जास्त भरीव निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील असेल" अशी प्रतिक्रिया आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी यानिमित्ताने दिली.
Advertisement-
Comments
Post a Comment