Posts

Showing posts from March, 2022

निपुण भारत हा विद्यार्थी केंद्री उपक्रम - आमदार मंगेश चव्हाण

Image
निपुण भारत हा विद्यार्थी केंद्री उपक्रम - आमदार मंगेश चव्हाण चाळीसगाव तालुक्यासाठी बी-प्लस उपक्रमाचे आ.मंगेश चव्हाण यांच्या हस्ते उदघाटन चाळीसगाव प्रतिनिधी:  चाळीसगाव तालुक्यात गट विकास अधिकारी नंदकुमार वाळेकर यांच्या संकल्पनेतुन व गट शिक्षणाधिकारी विलास भोई यांच्या माध्यमातून शाळांसाठी B- plus  अंतर्गत बाला उपक्रमाचे उदघाटन मा.आमदार मंगेश चव्हाण यांनी केले.तसेच शिक्षकांच्या शिकवणुकीमुळे मला कधीही व्यसनाने शिवले नाही.शिक्षक ही समाजाचे खरे आदर्श असतात.चाळीसगाव तालुक्यात अनेक शिक्षक चांगल्या संकल्पना मांडत असतात.त्यांचेही अभिनंदन असे मनोगत  पंचायत समिती शिक्षण विभाग व कृतिशील शिक्षण मंच यांच्या यांच्या संयोजनाने तालुकास्तरीय शिक्षण परिषदेचे आयोजन राजपूत मंगल कार्यालय येथे आमदार मंगेश चव्हाण यांनी केले.अध्यक्षस्थानी गटविकास अधिकारी मा.नंदकिशोर वाळेकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून मा. विकास पाटील हे उपस्थित होते.         मा.विलास भोई गटशिक्षणाधिकारी व नंदकुमार वाळेकर साहेब यांनी बाला उपक्रम शाळेत कशा पद्धतीने सुरू आहे याचे कामकाज पीपी...

इनरव्हिल क्लब ऑफ संगम चाळीसगावच्या वतीने तीन दिवसीय कराटे शिबिर संपन्न

Image
इनरव्हिल क्लब ऑफ संगम चाळीसगावच्या वतीने तीन दिवसीय कराटे शिबिर संपन्न चाळीसगाव प्रतिनिधी:   संगम इनरव्हिलच्या अध्यक्ष श्रीमती चंद्रकला साळुंखे यांनी कराटे प्रशिक्षक श्री सेनसाई खान सर III Dam Black Belt यांची भेट घेवून कराटे प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे " अंधशाळा ग्रॉऊंडवर ( मैदानात ) 3 दिवशीय शिबिर आयोजित करुन विद्यार्थ्यांना मार्शल आर्ट अंतर्गत कराटेचे विविध प्रकार एक्शन तसेच थांग ता मार्शल अंतर्गत ढाल / तलवारबाजी चे प्रशिक्षण आयोजित केले. कुंग फू कराटे मध्ये शिष्यांना परस्परांशी युध्द कराव लागत .           कराटे अंतर्गत मुलींना स्वरक्षणाचे प्रशिक्षण मिळते व असे शिक्षण मुलींना मिळणे ही काळाची गरज झाली असून मुलींनी खेळ , व्यायाम , कराटे शिकूनच घ्यायला हवेत.म्हणून ह्या प्रशिक्षणाचे आयोजन करुन सेंन्साई खान सरांनी संध्याकाळी 6 ते 7 ह्या वेळेत एकूण 50 मुले / मुलींना 3 दिवस उत्तम रित्या प्रशिक्षण दिले .बरेच मुली / मुली प्रशिक्षणानंतर कायमस्वरूपी क्लासला जॉईन झालीत .ह्यावेळी अध्यक्ष श्रीमती चंद्रकला साळुंखे , ISO लतिका पाटील , सदस्या मनिषा माल...

वर्धमानभाऊ धाडीवाल मित्र परिवाराच्या सहकार्याने दिव्यांग भगिनीचा विवाह थाटात संपन्न

Image
वर्धमानभाऊ धाडीवाल मित्र परिवाराच्या सहकार्याने दिव्यांग भगिनीचा विवाह थाटात संपन्न किशोर शेवरे चाळीसगाव प्रतिनिधी चाळीसगाव प्रतिनिधी:  चाळीसगाव येथील स्वयंदीप संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा मीनाक्षीताई निकम यांच्याऔ संकल्पनेतून आणि वर्धमान भाऊ धाडीवाल मित्र परिवाराच्या योगदानाने आखतवाडे तालुका पाचोरा येथील बाबूलाल लोटन परदेशी यांची दिव्यांग कन्या लोचना, (सरलाताई) व आखतवाडे तालुका सटाणा येथील कै. सुरेश त्र्यंबक खैरनार यांचे चिरंजीव भुषण यांचा विवाह आज धुळे रोड येथील बालाजी लॉन्स मध्ये मोठ्या थाटात संपन्न झाला दिव्यांग बंधू आणि भगिनी साठी सदैव मदतीचा हात देणारे सामाजिक कार्यकर्ते वर्धमान धाडीवाल यांनी गेल्या काही महिन्यांपूर्वीच दिव्यांग भगिनी सरलाताई हिचा विवाह मोठ्या थाटात लावून देण्याचे निश्चित केले होते त्याच बरोबर दिव्यांग भगिनी आणि बंधू यांचा सामूहिक विवाह सोहळा आयोजित करण्याचा देखील संकल्प केला होता त्याचाच एक भाग म्हणून आज रविवार दिनांक २७ मार्च रोजी सरलाताई व भुषण यांचा विवाह मोठ्या थाटात संपन्न झाला या विवाहाची संकल्पना स्वयंदीप  संस्थेच्या अध्यक्षा मीनाताई ...

रा.स.शि.प्र.मंडळाच्या सत्ताधारी संचालकांचा मनमानी कारभार,खोटे प्रोसेडिंग लिहून विरोधी संचालकांची केली दिशाभुल

Image
रा.स.शि.प्र.मंडळाच्या सत्ताधारी संचालकांचा मनमानी कारभार,खोटे प्रोसेडिंग लिहून विरोधी संचालकांची केली दिशाभुल चाळीसगाव प्रतिनिधी:   चाळीसगाव येथील राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळाच्या मागील व्यवस्थापन मंडळाच्या मासिक बैठकीत शहरातील राष्ट्रीय कन्या शाळा जागेच्या बाबत मूळ मालकाकडून आलेल्या प्रस्तावाबाबत चर्चा करणे हा विषय सभेच्या विषय पत्रिकेत घेण्यात आला होता .या विषयाला त्या बैठकीत संचालक आर्किटेक्ट धनजंय चव्हाण यांच्यासह विरोधी गटातील सहा संचालकांनी लेखी विरोध केला होता .जागेबाबत आलेल्या मुळ मालकाचा प्रस्ताव हा सत्ताधाऱ्यांनी स्वीकारलाचं कसा संचालक संस्थेचे मालक नसून संस्थेचे चार हजार सभासद हे संस्थेचे मुळ मालक आहे. संस्थेच्या सर्वसाधरण सभेत सभासदां समोर हा विषय ठेवून चर्चा झाली पाहिजे. जमिन मालकाच्या प्रस्ताबाचा स्वीकार करण्यापेक्षा संस्थेसाठी आवश्यक असलेल्या बाबींवर चर्चा होवू दया अशी रोखठोक भूमिका विरोधी संचालकांनी त्या बैठकीत घेतली होती .या विषया बाबत विरोधी संचालकांनी तालुका सहाय्यक निबंधक , जिल्हा निबंधक कार्यालयाकडे लेखी तक्रार विधीतज्ञांच्या मदतीने दाखल कर...

महाविकास आघाडी सरकार जुनी पेन्शन नक्कीच लागू करतील हा विश्वास आहे- गणेश गुरव सर

Image
महाविकास आघाडी सरकार जुनी पेन्शन नक्कीच लागू करतील हा विश्वास आहे- गणेश गुरव सर फैजपूर प्रतिनिधी: महाराष्ट्र राज्य १९८२ ची जुनी पेन्शन योजना मिळावी यासाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन योजना संघर्ष समिती तर्फे गेल्या ९३ दिवसांपासून मुंबई येथे आझाद मैदानावर धरणे आंदोलन करण्यात येत आहे.मा.विधानपरिषद सभापती यांच्या सुचनेनुसार आणि शिक्षक व पदवीधर विधान परिषद सदस्यांनी विचारलेल्या २००५ पुर्वी नियुक्त व नंतर १०० टक्के अनुदानावर आलेल्या शिक्षक,शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सन १९८२ ची जुनी पेन्शन योजना मिळणे बाबत या तारांकीत प्रश्नावर राज्याचे उपमुख्यमंत्री व वित्त मंत्री ना.अजित पवार यांनी सभागृहात उत्तर दिले.यावेळी ना.पवार म्हणाले की सदरची बाब ही सुप्रीम कोर्टात न्यायप्रविष्ट असून कोर्टाचा निकाल आल्यानंतर प्राधान्य क्रमाने जुनी पेन्शन योजना लागू करणेबाबतचा मुद्दा महाविकास आघाडी सरकार तर्फे त्वरित विचारात घेतला जाईल व न्याय दिला जाईल.            जुनी पेन्शन योजना संघर्ष समिती चे यावल रावेर तालुका प्रतिनिधी श्री.गणेश गुरव सर यांनीदेखील या निर्णयाचे स्वागत केल...

आमदार मंगेश चव्हाण यांचा मुंबईत घर घेण्यास नका; ,रुग्णांच्या नातेवाईकांसाठी निवारा बांधण्याची केली मागणी...

Image
आमदार मंगेश चव्हाण यांचा मुंबईत घर घेण्यास नकार, रुग्णांच्या नातेवाईकांसाठी निवारा बांधण्याची केली मागणी... राज्यातील ग्रामीण भागातील आमदारांना मुंबईत ३०० घरे देण्याची घोषणा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी विधानसभेत केली असता त्यावरून राज्यात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. चाळीसगाव तालुक्याचे आमदार मंगेश चव्हाण यांनी देखील या विषयावर आपली भूमिका स्पष्ट केली असून आमदारांना घरे नकोत राज्यातून मुंबईत दाखल होणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांसाठी हक्काचा निवारा बांधा अशी मागणी त्यांनी केली आहे. काय म्हणाले आमदार चव्हाण...?   राज्यातील शेतकरी व सर्वसामान्य वर्गाच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष करून आमदारांना घरे देण्याचा महाविकास आघाडी सरकारचा निर्णय चुकीचा असून मी वैयक्तिक रित्या आमदार या नात्याने याचा विरोध करतो.  घर नाही म्हणून कोणता आमदार मुंबईत रस्त्यावर झोपला असं आजवर झाले नाही. आमदारांऐवजी ग्रामीण भागातील हजारो रुग्ण मुंबईत उपचारासाठी येतात त्यांच्या नातेवाईकांना निवाऱ्यासाठी ती घरं उपलब्ध करून देण्यात यावीत अशी मागणी मी यानिमित्ताने करतो अशी प्रत...

रेशनकार्ड नसले तरीही मिळेल रेशन...केंद्रसरकारचा निर्णय

Image
रेशनकार्ड नसले तरीही मिळेल रेशन...केंद्रसरकारचा निर्णय नवी दिल्ली: शासनाच्या वतीने नागरिकांना रेशन वितरित केले जाते. याचा अनेक गोरगरिबांना मोठ्या प्रमाणावर फायदा होते. कोरोना सारख्या गंभीर महामारीत लोकांना रेशनच्या धान्याचा मोठा आधार होता. याबाबत केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. रेशन धान्य दुकानात धान्य घेताना रेशन कार्ड देणं गरजेच होते. मात्र आता शिधापत्रिका धारक जिथे राहतात, तेथील रेशन दुकानात फक्त रेशन कार्ड नंबर आणि आधार नंबर सांगितल्यानंतर त्यांना रेशन मिळणार आहे, अशी माहिती सार्वजनिक वितरण मंत्री पियुष गोयल यांनी दिली आहे.         काय म्हणाले केंद्र सरकार? सध्या रेशन कार्ड प्रक्रिया सोपी करण्यात आली असून देशात वन नेशन वन रेशन कार्डची सुविधा लागू करण्यात आली आहे. त्यामुळे जर एखाद्या व्यक्तीचे रेशनकार्ड त्याच्या मूळ राज्यात असेल आणि तो नोकरीनिमित्त दुसऱ्या शहरात आपल्या कुटुंबासह राहत असेल, तर त्याला त्याचा रेशनकार्ड क्रमांक आणि आधार कार्डची माहिती देऊन कोणत्याही रेशन दुकानातून धान्य मिळू शकते. यासाठी त्यांना मूळ रेशन कार्ड दाखवण्याची गरज नाही...

हभप रेवाबाबा चौधरी यांच्या स्मरणार्थ खान्देश नारीशक्ती तर्फे २५० विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

Image
हभप रेवाबाबा चौधरी यांच्या स्मरणार्थ खान्देश नारीशक्ती तर्फे २५० विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप फैजपूर प्रतिनिधी: फैजपूर येथील सामाजिक कार्यकर्ते व खान्देश नारीशक्ती फाऊंडेशन अध्यक्षा सौ.दिपाली चौधरी झोपे यांचे वडील ह.भ.प.स्व.रेवा चुडामण चौधरी यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शहरातील भक्त मंडळ संचलित पी.वाय.चौधरी विद्या मंदिर येथील सर्व विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वही,पेन वाटप करण्यात आले. दरम्यान यावेळी जवळपास २५० विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.           यावेळी सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन करुन पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे कार्याध्यक्ष व भाजपचे प्रदेश सदस्य श्री.भास्कर काशीराम चौधरी उर्फ बी.के.चौधरी हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून फैजपूर शहर पोलीस स्टेशन चे स.पोलीस निरीक्षक श्री.सिद्धेश्वर आखेगावकर साहेब, फैजपूर शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री.सलीम पिंजारी, इंडियन जर्नलीस्ट असोसिएशन जळगाव जि...

माणुसकी जिवंत आहे ...सेवाधर्म आणि नारीशक्ती च्या सदस्यांनी बेघर ला मिळवून दिला निवारा

Image
माणुसकी जिवंत आहे ...सेवाधर्म आणि नारीशक्ती च्या सदस्यांनी बेघर ला मिळवून दिला निवारा जळगाव प्रतिनिधी: जळगाव शहरातील वाल्मीक नगर कडे जाणाऱ्या रस्त्यावर लेंडीनाला पुलावर एक व्यक्ती गेल्या काही दिवसांपासून वास्तव्यास आहे. दुपारच्या उन्हात देखील त्याच पुलावर बसून असतो आणि उघड्यावरच उकिरड्या जवळ झोपतो कुणी काही खायला दिले तर कधी खातो कधी खात नाही. त्याची मदत करता येईल का अशी माहिती राहुल सोनवणे यांनी आपल्या वन्यजीव संस्थेच्या बाळकृष्ण देवरे यांना दिली.           वन्यजीव चे सदस्य घटनास्थळी पोचले त्याला खायला दिले तरी काहीच खाल्ले नाही त्याच्या निवार्याची सोय कुठे करता येईल म्हणून प्रयत्न सुरू असताना देवरे यांनी सेवधर्म गृप वर पोस्ट टाकून सदर व्यक्तीला निवारा मिळवून देण्यासाठी सहकार्य मागितले. याला नारीशक्ती बहुद्देशीय गृप च्या अध्यक्षा मनिषा पाटील यांनी तात्काळ सहमती दर्शवत सकाळी लवकर व्यवस्था करण्याचे आश्वासन दिले. मनीषा ताईंनी सकाळी 7:30 वाजताच  देवरे यांना कॉल केला आणि सदर व्यक्तीला निवारा देण्यासाठी निघाल्या असल्याचं  सांगत 15 म...

दारु पिलेल्या पत्नीचा डोक्यात कुऱ्हाड टाकून पतीने केला खुन

Image
दारु पिलेल्या पत्नीचा डोक्यात कुऱ्हाड टाकून पतीने केला खुन चाळीसगाव प्रतिनिधी: चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे पोलीस स्टेशन हद्दीत एक थरारक घटना घडली असून पत्नी दारु पिऊन आल्याने पतीने रागाच्या भरात पत्नीच्या डोक्यात कुऱ्हाड घालून पत्नीचा निघृण खून केलाय. याप्रकरणी मेहूणबारे पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.        सविस्तर वृत्त असे की मेहूणबारे येथील ज्ञानेश्वर सोमनाथ माळी यांच्या शेतात  मार्च- २०२१ मध्ये कुवरसिंग चत्तरसिंग पावरा (रा. मोहरतमाळ, राज्य मध्यप्रदेश) हा आपली पत्नी व मुलांसह सालाने काम करण्यासाठी आला होता. तो याचठिकाणी एका शेडमध्ये पत्नी व मुलांबरोबर राहत होता.कुंवरसिंग याची पत्नी निनुबाई कुवरसिंग पावरा यांनी मद्यपान केले होते. दरम्यान कुवरसिंग चत्तरसिंग पावरा यांनी आपल्या पत्नीला तु मद्यपान का केले ? असा जाब विचारून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. हा वाद विकोपाला गेल्यावर घरात पडलेली कुऱ्हाड डोक्यात घालून निनुबाईची निघृणपणे हत्या केली. सदर घटना १८ मार्च रोजी रात्री १० वाजताच्या सुमारास घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच मेहूणबारे पोलिस सपोनि व...

बीएचआर ठेवीदारांसाठी खुशखबर; लवकर करा हे काम..

Image
बीएचआर ठेवीदारांसाठी खुशखबर; लवकर करा हे काम.. जळगाव प्रतिनिधी : कोट्यवधींच्या ठेवी असलेली बीएचआर अर्थात भाईचंद हिराचंद रायसोनी या अवसायनातील मल्टीस्टेट पतसंस्थेच्या ठेवीदारांच्या ठेवी परताव्याचे एक धोरण तयार करण्यात आले आहे. त्या धोरणानुसार मार्च ते जून या काळातील 25 लाख रुपयांपर्यंतच्या ठेवीची वीस टक्के रक्कम ठेवीदारांना देण्याचे निश्चीत करण्यात आल्याचे बीएचआर चे अवसायक चैतन्यकुमार नासर यांनी म्हटले आहे.         ठेवीदारांना केवायसी जमा करण्याचे आवाहन अवसायकांच्या वतीने करण्यात आले होते. सदर संस्था अवसायनात असल्यामुळे मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटीज अ‍ॅक्ट 2002 चे कलम 90 प्रमाणे ठेवीदारांना संस्थेकडे त्यांच्या ठेव रकमेची मागणी करणे आवश्यक आहे. प्राधान्य क्रमानुसार संस्थेच्या कायद्याप्रमाणे ठेवीदारांना त्यांचा परतावा देण्याचे काम केले जात आहे. वैद्यकीय, जेष्ठ नागरिक, लग्नकार्य, शैक्षणीक आदी कामकाजासाठी ग्राहक मंचाच्या आदेशानुसार आजच्या घडीला पाच लाख रुपयांपर्यंतच्या ठेव रकमेपैकी पहिला टप्पा प्रो रेटनुसार वीस टक्के रकमेचे वितरण सुरु आहे. ठेवी...

चाळीसगाव तालुक्यातील ५ वर्षीय बालिकेवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला मरेपर्यंत जन्मठेप:पो.ऊ.नि.शिंदे यांची जबरदस्त कामगिरी

Image
चाळीसगाव तालुक्यातील ५ वर्षीय बालिकेवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला मरेपर्यंत जन्मठेप:पो.ऊ.नि.शिंदे यांची जबरदस्त कामगिरी किशोर शेवरे चाळीसगाव प्रतिनिधी चाळीसगाव प्रतिनिधी:   चाळीसगाव तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या चिमुकलीला खाऊचे आमिष दाखवत अत्याचार करणाऱ्या नराधमाला मरेपर्यंत जन्मठेप आणि ५ हजाराचा दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. संदीप सुदाम तिरमली (वय-३६, रा. शिरसगाव ता. चाळीसगाव) असे आरोपीचे नाव आहे.          चाळीसगाव तालुक्यातील एका गावात राहणारी ५ वर्षीय चिमुकलीवर ३ जानेवारी २०२१ रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास घराशेजारीच मुलींमध्ये खेळण्यासाठी गेली असता संदीप सुदाम तिरमली या नराधामाने या बालिकेला खाऊचे आमिष दाखवून हातात दहा रूपयाच्या तीन नोटा देवून घरात बोलावून तिच्यावर अत्याचार केला. चिमुकली रडत रडत घरी आल्यावर हा प्रकार समोर आला. तिच्यावर अत्याचार करणाऱ्या संदीप यास याबाबत हटकले असता तो पळून गेला. या घटनेनंतर पीडित मुलीच्या आई वडिलांच्या फिर्यादीवरून संदीप सुदाम तिरमली याच्या विरोधात पोस्को कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. ...

चाळीसगाव ग्रामीण पोलीसांनी केली चौघांना अटक; विवाहितेचे चोरीस गेलेले १३ तोळे सोने मिळाले परत

Image
चाळीसगाव ग्रामीण पोलीसांनी केली चौघांना अटक; विवाहितेचे चोरीस गेलेले १३ तोळे सोने मिळाले परत किशोर शेवरे चाळीसगाव प्रतिनिधी चाळीसगाव प्रतिनिधी: चाळीसगांव ग्रामीण पोलीस स्टेशनला दिनांक 28/01/2022 रोजी फिर्यादी सौ. अंकिता प्रतीक पाटील, वय 25, धंदा- गृहीणी, रा. पोलीस क्वार्टर नं. 18 रुम नं. 265 ता. जि. अहमदनगर यांनी पोलीस स्टेशनला येऊन फिर्याद दिली की, दिनांक 27/01/2022 रोजी फिर्यादी व त्यांची आई असे अहमदनगर येथून मालेगांव व मालेगांव येथून चाळीसगांव आले व चाळीसगांव राष्ट्रीय विद्यालय येथून पॅजो रिक्षात बसून हिरापूर येथे फिर्यादीचे लग्नाचे सोन्याचे दागिन्यांचा बॉक्स त्यांचे कपडयांचे बॅगेत ठेवून घेऊन जात असतांना त्या दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी त्यांचे कपड्यांच्या बॅगेचा कप्प्याची चैन उघडून त्याचा मधला कप्पा कापून त्यातील 5,32,000/- रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा बॉक्स चोरुन नेला होता. त्यावरुन चाळीसगांव ग्रामीण पोलीस स्टेशनला दिनांक 28/01/2022 रोजी गुरनं. 85/2022 भादंवि कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याचा तपास मा. पोलीस निरीक्षक सो.संजय ठेंगे साहेब य...

वडाळा आरोग्य उपकेंद्राला संतप्त ग्रामस्थांनी लावले कुलूप

Image
वडाळा आरोग्य उपकेंद्राला संतप्त ग्रामस्थांनी लावले कुलूप वडाळा प्रतिनिधी किशोर शेवरे वडाळा प्रतिनिधी: वडाळा येथे मागील काही वर्षापासून आरोग्य सुविधा मिळत नसल्याने संतप्त ग्रामस्थांनी आरोग्य उपकेंद्राला कुलूप लावले. या ठिकाणी शासनाकडून आरोग्य विभागाच्या मार्फत मिळणाऱ्या विविध सुख सुविधा सर्वसामान्य नागरिकांना मिळाव्यात अशी ग्रामस्थांची मागणी आहे. या ठिकाणी नागरिकांना आरोग्य विभागाकडून गोळ्या,औषधी मिळाव्यात, त्याचप्रमाणे  महिला प्रस्तुती याठिकाणी व्हावी, आरोग्य उपकेंद्रात शौचालय व पाण्याची सोय करून मिळावी, तसेच वडाळा आरोग्य उपकेंद्रात कोण कोणते कर्मचारी यांची नियुक्ती केलेली आहे? त्यांचे नाव व कामाचे वेळापत्रक लावण्यात यावे. अशी गावातील सुज्ञ नागरिकांकडून मागणी करण्यात येत आहे. संबंधित आरोग्य विभागाच्या वरिष्ठांनी त्वरित या प्रकरणात लक्ष घालून योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत.

इनरव्हिल क्लब ऑफ संगम चाळीसगाव आयोजित " कळी उमलताना किंवा वयात येतांना " या विषयावर समुपदेशन

Image
इनरव्हिल क्लब अॉफ संगम चाळीसगाव आयोजित  " कळी उमलताना किंवा वयात येतांना " या विषयावर समुपदेशन चाळीसगाव प्रतिनिधी: भास्कराचार्य इंटरनॅशनल स्कूल नेताजी चौक , कामगार भुवन येथे आज दिनांक - 15/3/2022 मंगळवार रोजी कळी उमलतांना या विषयावर समुपदेशक - रणजीत सखाराम गव्हाळे व सुनिता भोसले मॕडम यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते .यावेळी Class 7  , 8 , 9 च्या विद्यार्थींना या वयात होणारे भावनिक , मानसिक व शारीरिक बदल व त्यावेळी घ्यायची काळजी यावर मानसशास्त्र तज्ञ रणजीत गव्हाळे सर यांनी उपयुक्त असे मार्गदर्शन केले .            तसेच सुनिता भोसले मॕडम यांनीही मुलींना सॕनिटरी नॕपकीनचा वापर करण्याची व वापरानंतर तो नष्ट कसा करावा याविषयी माहिती दिली .तसेच ह्या दिवसात मुलींनी कोणकोणती काळजी घ्यावी यावर काही समस्या वाटल्यास घरातील आई , बहिण , मैञीण यांच्याशी संवाद साधून मनमोकळे पणाने आपले problem  सांगून योग्य ती काळजी घ्यावी सांगण्यात आले .मुलींनी आपल्या मनातील शंका उपस्थित करुन त्यांची योग्य उत्तरे सरांनी दिलीत .याप्रसंगी प्राचार्...

वाळु माफियांचा धुमाकूळ: जामदा येथील आदिवासी महादेव कोळी शेतकऱ्यावर प्राणघातक हल्ला

Image
वाळुमाफियांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी आदिवासी महादेव कोळी समाज बांधवांचा चाळीसगाव तहसील वर मोर्चा किशोर शेवरे चाळीसगाव प्रतिनिधी:  जामदा तालुका चाळीसगाव येथील आदिवासी महादेव कोळी जमातीचा मोहन सोनवणे या मुलाच्या शेताला लागून वाळू माफियांचा रस्ता आहे  त्यांना आदीवासी शेतकरी पुत्राने अडवले व सांगितले की माझ्या शेतातील पिकाचे नुकसान होत आहे असे सांगताच वाळू माफियांनी सर्वांनी जमुन त्या मुलाला इतकं मारलं की त्याला नऊ दहा टाके पडले. त्या मुलांनी पोलीस स्टेशन मध्ये एफ आर दाखल केली त्या वाळू माफियांना अजून पर्यंत अटक झालेली नाही.           दरम्यान जामदा व परिसरात रात्रंदिवस  वाळू  चोरणे चालू आहे.यासाठी अन्याय विरोधात आदीवासी महादेव कोळी जमातीच्या जामदा गावातील अन्यायग्रस्त महीलांनी, वाल्या सेना च्या युवकांनी आदीवासी कोळी जमातीच्या रणरागिणी गीतांजली कोळी यांच्या नेतृत्वाखाली तहसील आँफिस चाळीसगाव, मेहूणबारे पोलीस स्टेशन येथे धडक मोर्चा काढून आदीवासी महादेव कोळी शेतकरी वर हल्ला करणा-या वाळू माफियांवर अद्याप कारवाई का केली नाही म्हणु...

नारीशक्ती बहुद्देशीय संस्था जळगाव तर्फे कर्तृत्ववान महिलांचा सन्मान

Image
नारीशक्ती बहुद्देशीय संस्था जळगाव तर्फे कर्तृत्ववान महिलांचा सन्मान जळगाव प्रतिनिधी: आज दिनांक १३/०३/२०२२ रोजी नारीशक्ती बहुद्देशीय संस्था जळगाव तर्फे कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला. या प्रसंगी प्रमुख अतिथी महापौर मा जयश्री महाजन, अप्पर पोलीस अधीक्षक मा चंद्रकांत गवळी साहेब, रोटरी वेस्टचे मा वीरेंद्र छाजेड, रोटरियन मा पूजा अग्रवाल, मा आशा मौर्य, सेवाधर्म संस्था अध्यक्ष मा चंद्रशेखर नेवे नारीशक्ती बहुद्देशीय संस्थाअध्यक्ष मनिषा पाटील उपास्थित होते.        याप्रसंगी कठीण परिस्थितीत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला. यात एड्स वर कार्य करणाऱ्या डॉ नीलिमा सेठिया, दिव्यांग सविता साळुंखे, निस्वार्थ वृत्तीने मोफत योगवर्ग घेणाऱ्या महानंदा पाटील, नेहा जगताप, आशा निंबाळकर, बेबीताई चांदेलकर, मीना कोळी, सुश्मिता भालेराव,रेखा महाजन, ज्योती घोडके, आशा जगताप,सुरेखा जंजाळकर यासंह भगिनींचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यात पिंक रिक्षा चालक, पेट्रोल पंप वर काम करणाऱ्या, तर धुणे भांडी करून आपल्या मुलाला डॉक्टर बनविणाऱ्या महिला...

चाळीसगाव वासीयांच्या मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीचे स्वप्न आ.मंगेश चव्हाणांनी केलं पूर्ण

Image
चाळीसगाव वासीयांच्या मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीचे स्वप्न आ.मंगेश चव्हाणांनी केलं पूर्ण आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या प्रयत्नाने अर्थसंकल्पात १५ कोटी मंजूर;१० शासकीय विभाग येणार एकाच छताखाली चाळीसगाव प्रतिनिधी - जळगाव जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका असणाऱ्या चाळीसगाव येथे प्रांत, तहसिल व भूमी अभिलेख आदी महसूल विभागाचे कार्यालय हे चाळीसगाव शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी कार्यरत असून बरेच कार्यालय हे भाड्याच्या इमारतीत सुरू आहेत. त्यामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतो व किरकोळ कामांसाठी देखील या कार्यालयातून त्या कार्यालयात जाण्यासाठी पायपीट करावी लागते.       ही कार्यालये शहराच्या रहदारीच्या ठिकाणी असल्याने वाहतुकीची कोंडी होणे यामुळे नागरिकांसह विविध शासकीय विभागांची देखील गैरसोय होत होती. अनेक तालुक्यांना सर्व विभाग एकाच ठिकाणी असणारी मध्यवर्ती प्रशासकीय इमारत असल्याने चाळीसगाव तालुक्यात देखील ती असावी अशी मागणी अनेक दशकांपासून होत होती. याबाबत आमदार मंगेश चव्हाण यांनी पुढाकार घेत याबाबतचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभाग व महसुल विभ...

भाजपाच्या विजयाचे फटाके फोडत असतांनाच आ. मंगेश चव्हाणांनी चाळीसगाव राष्ट्रवादीच्या गोटात लावला बॉम्ब

Image
  चाळीसगाव तालुका राष्ट्रवादी कोषाध्यक्ष, ब्राम्हणशेवगे गावाचे सरपंच, माजी मार्केट संचालक हेमराज (पिंटूदादा) बाविस्कर यांचा भाजपात प्रवेश चाळीसगाव प्रतिनिधी : एकीकडे देशातील चार राज्यांच्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाल्याने भाजपा कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून सगळीकडे विजयाचे फटाके फोडले जात आहेत. मात्र विजयाचे फटाके कमी की काय याच दिवशी चाळीसगाव तालुक्यात भाजपा आमदार मंगेश चव्हाण यांनी राष्ट्रवादीच्या गोटात बॉम्बच फोडला आहे. चाळीसगाव तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विद्यमान तालुका कार्याध्यक्ष, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक व ब्राम्हणशेवगे गावाचे सरपंच आणि विकास सोसायटी तसेच दुध उत्पादक सोसायटीचे चेअरमन हेमराज उर्फ पिंटूदादा बाविस्कर यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश घेतला आहे. मुंबई येथे भाजपा प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, जेष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील, आमदार प्रसाद लाड यांच्या हस्ते हा प्रवेश सोहळा संपन्न झाला. यावेळी चाळीसगाव तालुक्यातील भाजपा पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमदार मंगेश चव्हाण यांच्या ने...

तांबोळे येथे दिगंबर भाऊ कुमावत युवा मंचाच्या नेत्ररोग तपासणी शिबीरात 110 ग्रामस्थांची तपासणी

Image
  तांबोळे येथे दिगंबर भाऊ कुमावत युवा मंचाच्या नेत्ररोग तपासणी शिबीरात 110 ग्रामस्थांची तपासणी चाळीसगाव प्रतिनिधी: दिगंबर भाऊ युवा मंचच्या वतीने जनसेवा हीच ईश्वर सेवा हे ब्रीद डोळ्या समोर ठेवून कोणत्याही बडे जाब पणा न करता गेल्या काही दिवसापासून तांबोळे इतर गावांमध्ये सामाजिक व धार्मिक उपक्रम राबवले जात असून त्याचा ग्रामस्थांना फायदा होत असल्याची उत्कृष्ट प्रतिक्रिया  परिसरात उमटत आहे चाळीसगाव प्रतिनिधी तालुक्यातील तांबोळे येथे दिगंबर भाऊ कुमावत युवा मंच व विशाल धनगर यांच्यावतीने रोटरी आय हॉस्पिटल माध्यमातून नेत्र तपासणी शिबिराला परिसरातील 110 ग्रामस्थांची मोफत तपासणी करण्यात आली. या शिबिरात तपासणी आलेल्या ग्रामस्थांची रोटरी आय हॉस्पिटल नेत्र तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करण्यात आली दिगंबर भाऊ कुमावत युवा मंचच्या आरोग्य संदर्भात सामाजिक उपक्रमांचे ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे शिबिर यशस्वीतेसाठी विशाल भाऊ धनगर यांनी परिश्रम घेतले दिगंबर भाऊ कुमावत यांनी उमेदवारी घेऊन पुढे यावं असं देखील यावेळी काही ग्रामस्थ म्हणाले गेल्या अनेक वर्षापासून गावात कुठल्याही शिबिर राबवण्यात आले नसून दि...

पाडळसे प्रा.आ.केंद्रात महिला दिनानिमित्त नारीशक्ती च्या दिपाली चौधरी व स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ.कुंदन फेगडे यांचे मार्गदर्शन

Image
  पाडळसे प्रा.आ.केंद्रात महिला दिनानिमित्त नारीशक्ती च्या दिपाली चौधरी व स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ.कुंदन फेगडे यांचे मार्गदर्शन फैजपूर प्रतिनिधी: ग्रामीण भागात प्रत्यक्ष रुग्णांशी संपर्क साधून आरोग्य विषयक जनजागृती करणाऱ्या आशा स्वयंसेवीकांच्या वतीने महिलांचा हक्काचा दिवस म्हणजे जागतिक महिला दिन पाडळसा प्राथमिक आरोग्य केंद्रात साजरा करण्यात आला.           यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खान्देश नारीशक्ती फाऊंडेशन अध्यक्षा सौ.दिपाली चौधरी झोपे होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ व नगरसेवक डॉ.कुंदन फेगडे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सौ.दिपाली चौधरी आणि डॉ.कुंदन फेगडे यांच्या हस्ते क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करुन माल्यार्पण करण्यात आले. कोरोना काळात महत्वपूर्ण कामगिरी बजावत सेवा दिल्यामुळेच आज आपण मोकळा श्वास घेऊ शकतो त्यांचे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत असे प्रतिपादन यावेळी खान्देश नारीशक्ती अध्यक्षा सौ.दिपाली चौधरी झोपे यांनी केले.यावेळी डॉ.कुंदन फेगडे यांनीदेखील आरोग्यविषयक अनमोल मार्गदर्शन केले. याप्रस...

गोव्यात देखील चालला आमदार मंगेश चव्हाण यांचा करिष्मा

Image
  पक्षश्रेष्ठींचा विश्वास सार्थ ठरवत गोव्यातील नावेलीम मध्ये इतिहासात पहिल्यांदा फुलवल कमळ हाय व्होल्टेज लढतीत भाजपा उमेदवार उल्हास तुयेकर विजयी , आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह चाळीसगाव तालुक्यातील ३० हून अधिक भाजपा पदाधिकारी यांच्या मेहनतीला यश... नावेलीम (गोवा) - गोव्याचे लोकप्रिय नेते स्व.मनोहर पर्रीकर यांच्या निधनानंतर पहिल्यांदा पार पडत असलेल्या गोवा निवडणुक प्रभारी पदाची जबाबदारी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांच्याकडे केंद्रीय नेतृत्वाने सोपवली होती. महाराष्ट्र गोमंतक पक्षाशी असलेली युती तुटल्याने भाजपाने यावेळी गोव्यात प्रथमच सर्वच्या सर्व ४० जागांवर निवडणूक लढवली होती. देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू शिलेदार माजीमंत्री गिरीषभाऊ महाजन यांच्यावर गोव्यात आजवर ज्या जागांवर भाजपा जिंकलेली नाही अश्या काही मोजक्या जागांची जबाबदारी देण्यात आली. देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात माजीमंत्री गिरीषभाऊ महाजन यांनी आपल्या कौशल्याने या सर्व जागांचा अभ्यास केला व रणनीती ठरवली. त्यातील भाजपा स्थापनेपासून एकदाही निवडणूक लढलेली नाही अश्या नावेलीम मतदारसंघाची संपूर्ण जबाबदारी...