रा.स.शि.प्र.मंडळाच्या सत्ताधारी संचालकांचा मनमानी कारभार,खोटे प्रोसेडिंग लिहून विरोधी संचालकांची केली दिशाभुल
रा.स.शि.प्र.मंडळाच्या सत्ताधारी संचालकांचा मनमानी कारभार,खोटे प्रोसेडिंग लिहून विरोधी संचालकांची केली दिशाभुल
चाळीसगाव प्रतिनिधी: चाळीसगाव येथील राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळाच्या मागील व्यवस्थापन मंडळाच्या मासिक बैठकीत शहरातील राष्ट्रीय कन्या शाळा जागेच्या बाबत मूळ मालकाकडून आलेल्या प्रस्तावाबाबत चर्चा करणे हा विषय सभेच्या विषय पत्रिकेत घेण्यात आला होता .या विषयाला त्या बैठकीत संचालक आर्किटेक्ट धनजंय चव्हाण यांच्यासह विरोधी गटातील सहा संचालकांनी लेखी विरोध केला होता .जागेबाबत आलेल्या मुळ मालकाचा प्रस्ताव हा सत्ताधाऱ्यांनी स्वीकारलाचं कसा संचालक संस्थेचे मालक नसून संस्थेचे चार हजार सभासद हे संस्थेचे मुळ मालक आहे. संस्थेच्या सर्वसाधरण सभेत सभासदां समोर हा विषय ठेवून चर्चा झाली पाहिजे. जमिन मालकाच्या प्रस्ताबाचा स्वीकार करण्यापेक्षा संस्थेसाठी आवश्यक असलेल्या बाबींवर चर्चा होवू दया अशी रोखठोक भूमिका विरोधी संचालकांनी त्या बैठकीत घेतली होती .या विषया बाबत विरोधी संचालकांनी तालुका सहाय्यक निबंधक , जिल्हा निबंधक कार्यालयाकडे लेखी तक्रार विधीतज्ञांच्या मदतीने दाखल करण्यात केली आहे . त्या तक्रारीच्या अनुषंगांने चॉकशी देखील सुरू आहे .दि .३१ ऑगस्ट २०१ ९ रोजी झालेल्या व्यवस्थापन मंडळाच्या बैठकीत प्रोसिंडिंग बुकचे बाचन करतांना राष्ट्रीय कन्या शाळेच्या जागेबाबत मुळ मालकांच्या प्रस्तावाला विरोधीसह सर्व संचालकांची मान्यता असल्याचे लिहिलेले दिसून आले.प्रोसेडिंग बुक बेकायदेशीर मनमानीपध्दतीने तयार करून विरोधी संचालकांचा हया विषयाला लेखी विरोध दर्शविला असता देखील चुकीची व दिशाभूल करणारी माहिती प्रोसिडिंग बुकात लिहिण्याचे धाडस सत्तारूढ कार्यकारिणीने स्वार्थ हेतूने केले आहे.
याबाबत विरोधी संचालकांनी त्यांना ह्या बैठकीत जाब विचारला असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.त्यांचे हे कृत्य बेकायदेशीर असून कायदयाचे भंग करणारे आहे . खोटे व बनावट प्रोसेडिंग लिहिलेल्याबाबत सत्तारूढ कार्यकारिणी विरोधात संबंधित विभागाकडे तक्रार करून कायदेशीर रित्या न्यायालयात देखील हया विरोधात दाद मागण्यात येणार असल्याचे संचालक धनंजय चव्हाण यांनी सांगितले आहे . दि .27 मार्च 2022 वार रविवार रोजी संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा होत असून त्यात हया विषयांवर उहापोह होणार असून सभासदांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून या विषयांवरील चर्चेत सहभागी होण्याचे आवाहन संचालक धनजंय चव्हाण यांनी केले आहे . हया विषयाबाबत सत्ताधारी संचालकांची भुमिका संशयास्पद असून मुळ मालकाचे हित साधत संस्थेच्या हिताकडे दुर्लक्ष करणारी आहे .आर्थिक देवाण घेवाणीतून सत्ताधारी संचालक आर्थिक स्वार्थ कडे बघून हया भुमिकेचा स्वीकार करत आहे त्यामुळेच खोटे प्रोसेडिंग लिहीण्याचे धाडस केले असल्याचा संशय सभासदांमधून व्यक्त केला जात आहे . सत्तारूढ संचालकांचे हे कृत्य निषेधार्ह असून याबाबत पूर्ण खुलासा होणे गरजेचे असल्याची मागणी देखील सभासदांनी केली आहे .
Comments
Post a Comment