इनरव्हिल क्लब ऑफ संगम चाळीसगावच्या वतीने तीन दिवसीय कराटे शिबिर संपन्न

इनरव्हिल क्लब ऑफ संगम चाळीसगावच्या वतीने तीन दिवसीय कराटे शिबिर संपन्न

चाळीसगाव प्रतिनिधी:  संगम इनरव्हिलच्या अध्यक्ष श्रीमती चंद्रकला साळुंखे यांनी कराटे प्रशिक्षक श्री सेनसाई खान सर III Dam Black Belt यांची भेट घेवून कराटे प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे " अंधशाळा ग्रॉऊंडवर ( मैदानात ) 3 दिवशीय शिबिर आयोजित करुन विद्यार्थ्यांना मार्शल आर्ट अंतर्गत कराटेचे विविध प्रकार एक्शन तसेच थांग ता मार्शल अंतर्गत ढाल / तलवारबाजी चे प्रशिक्षण आयोजित केले. कुंग फू कराटे मध्ये शिष्यांना परस्परांशी युध्द कराव लागत .
          कराटे अंतर्गत मुलींना स्वरक्षणाचे प्रशिक्षण मिळते व असे शिक्षण मुलींना मिळणे ही काळाची गरज झाली असून मुलींनी खेळ , व्यायाम , कराटे शिकूनच घ्यायला हवेत.म्हणून ह्या प्रशिक्षणाचे आयोजन करुन सेंन्साई खान सरांनी संध्याकाळी 6 ते 7 ह्या वेळेत एकूण 50 मुले / मुलींना 3 दिवस उत्तम रित्या प्रशिक्षण दिले .बरेच मुली / मुली प्रशिक्षणानंतर कायमस्वरूपी क्लासला जॉईन झालीत .ह्यावेळी अध्यक्ष श्रीमती चंद्रकला साळुंखे , ISO लतिका पाटील , सदस्या मनिषा मालपूरे , विद्या पाटील , अनिता मोरे ह्या उपस्थित होत्या .यामुळे मुली स्वतःचे संरक्षण स्वतः करतील , प्रशिक्षणामुळे त्यांचा मूड फ्रेश राहिल , शैक्षणिक व बौद्धिक प्रगतीत वाढ होणार .एकंदरीत प्रोजेक्ट शारीरिक , मानसिक , बौद्धिक व भावनिक विकासासाठी उपयुक्त होता .

Comments

Popular posts from this blog

खान्देश नारीशक्ती चा राज्यस्तरीय नारीदिप सन्मान पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

होय आम्ही शिकणार.. संघर्ष करणार - चाळीसगाव येथील स्व.रामराव जिभाऊ पाटील शिष्यवृत्ती प्राप्त ४२५ विद्यार्थ्यांनी केला निर्धार ; आ.मंगेश चव्हाण यांचे शैक्षणिक दातृत्व