तांबोळे येथे दिगंबर भाऊ कुमावत युवा मंचाच्या नेत्ररोग तपासणी शिबीरात 110 ग्रामस्थांची तपासणी
तांबोळे येथे दिगंबर भाऊ कुमावत युवा मंचाच्या नेत्ररोग तपासणी शिबीरात 110 ग्रामस्थांची तपासणी
चाळीसगाव प्रतिनिधी: दिगंबर भाऊ युवा मंचच्या वतीने जनसेवा हीच ईश्वर सेवा हे ब्रीद डोळ्या समोर ठेवून कोणत्याही बडे जाब पणा न करता गेल्या काही दिवसापासून तांबोळे इतर गावांमध्ये सामाजिक व धार्मिक उपक्रम राबवले जात असून त्याचा ग्रामस्थांना फायदा होत असल्याची उत्कृष्ट प्रतिक्रिया परिसरात उमटत आहे चाळीसगाव प्रतिनिधी तालुक्यातील तांबोळे येथे दिगंबर भाऊ कुमावत युवा मंच व विशाल धनगर यांच्यावतीने रोटरी आय हॉस्पिटल माध्यमातून नेत्र तपासणी शिबिराला परिसरातील 110 ग्रामस्थांची मोफत तपासणी करण्यात आली. या शिबिरात तपासणी आलेल्या ग्रामस्थांची रोटरी आय हॉस्पिटल नेत्र तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करण्यात आली दिगंबर भाऊ कुमावत युवा मंचच्या आरोग्य संदर्भात सामाजिक उपक्रमांचे ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे शिबिर यशस्वीतेसाठी विशाल भाऊ धनगर यांनी परिश्रम घेतले दिगंबर भाऊ कुमावत यांनी उमेदवारी घेऊन पुढे यावं असं देखील यावेळी काही ग्रामस्थ म्हणाले गेल्या अनेक वर्षापासून गावात कुठल्याही शिबिर राबवण्यात आले नसून दिगंबर भाऊंचे कौतुक होत आहे. त्यावेळी ग्रामसेवक आर व्ही पाटील सामाजिक कार्यकर्ते रोहित जाधव ग्रामपंचायत सदस्य संभाजी शिंदे, शंकर पाटील, किशोर पाटील, साहेबराव कोल्हे, स्वप्नील पाटील, नितीन कुमावत, सचिन कुमावत, इतर ग्रामस्थ उपस्थित होते.
Comments
Post a Comment