दारु पिलेल्या पत्नीचा डोक्यात कुऱ्हाड टाकून पतीने केला खुन



दारु पिलेल्या पत्नीचा डोक्यात कुऱ्हाड टाकून पतीने केला खुन

चाळीसगाव प्रतिनिधी: चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे पोलीस स्टेशन हद्दीत एक थरारक घटना घडली असून पत्नी दारु पिऊन आल्याने पतीने रागाच्या भरात पत्नीच्या डोक्यात कुऱ्हाड घालून पत्नीचा निघृण खून केलाय. याप्रकरणी मेहूणबारे पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
       सविस्तर वृत्त असे की मेहूणबारे येथील ज्ञानेश्वर सोमनाथ माळी यांच्या शेतात  मार्च- २०२१ मध्ये कुवरसिंग चत्तरसिंग पावरा (रा. मोहरतमाळ, राज्य मध्यप्रदेश) हा आपली पत्नी व मुलांसह सालाने काम करण्यासाठी आला होता. तो याचठिकाणी एका शेडमध्ये पत्नी व मुलांबरोबर राहत होता.कुंवरसिंग याची पत्नी निनुबाई कुवरसिंग पावरा यांनी मद्यपान केले होते. दरम्यान कुवरसिंग चत्तरसिंग पावरा यांनी आपल्या पत्नीला तु मद्यपान का केले ? असा जाब विचारून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. हा वाद विकोपाला गेल्यावर घरात पडलेली कुऱ्हाड डोक्यात घालून निनुबाईची निघृणपणे हत्या केली. सदर घटना १८ मार्च रोजी रात्री १० वाजताच्या सुमारास घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच मेहूणबारे पोलिस सपोनि विष्णू आव्हाड, प्रकाश चव्हाण, धर्मराज पाटिल, सुभाष पाटिल, मोहन सोनावने, गोरख चकोर, हनुमंत वाघेरे, योगेश बोडके यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.
          दरम्यान याप्रकरणी पती कुवरसिंग याला मेहूणबारे पोलिसांनी अटक केले आहे. यावेळी पती कुवरसिंग याने पत्नीच्या डोक्यात कुऱ्हाड घालून हत्या केल्याची कबुली दिली. यासंदर्भात ज्ञानेश्वर माळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मेहूणबारे परिसरात भादवी कलम- ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणाचा पुढील तपास सपोनि विष्णू आव्हाड यांच्या निर्देशानुसार सुरू आहे.

Comments

Popular posts from this blog

खान्देश नारीशक्ती चा राज्यस्तरीय नारीदिप सन्मान पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

होय आम्ही शिकणार.. संघर्ष करणार - चाळीसगाव येथील स्व.रामराव जिभाऊ पाटील शिष्यवृत्ती प्राप्त ४२५ विद्यार्थ्यांनी केला निर्धार ; आ.मंगेश चव्हाण यांचे शैक्षणिक दातृत्व