जागतिक महिला दिनानिमित्त खान्देश नारीशक्ती फाऊंडेशन तर्फे कर्तृत्ववान महिलांचा सन्मान

 


जागतिक महिला दिनानिमित्त खान्देश नारीशक्ती फाऊंडेशन तर्फे कर्तृत्ववान महिलांचा सन्मान



फैजपूर प्रतिनिधी: जागतिक महिला दिनानिमित्त फैजपूर येथील सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या खान्देश नारीशक्ती फाऊंडेशन या महिला संघटनेच्या वतीने शहरातील प्रत्येक प्रभागातील विविध क्षेत्रातील व विविध समाजातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खान्देश नारीशक्ती फाऊंडेशन अध्यक्षा सौ.दिपाली चौधरी झोपे होत्या.महिलांना सन्मानासाठी कोणत्या एका विशिष्ट दिवसाची गरज नसून महिला तीच्या कर्तृत्ववाने नेहमीच सन्माननीय आहे असे प्रतिपादन यावेळी सौ.दिपाली चौधरी झोपे यांनी केले.


             कार्यक्रमाच्या सुरुवातीला राजमाता जिजाऊ माँसाहेब आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी कल्पना चुडामण पाटील, सुनंदा रघुनाथ भारंबे, सिमा (सविता)अनिल नारखेडे, हर्षदा चौधरी, लता चंद्रकांत कोल्हे, भारती संजीव भावसार, ज्योती मनोज भावसार, दिपमाला विनोद भावसार, कमल वासुदेव मंडवाले, पल्लवी किशोर सोनार, आरती किशोर सोनार, मंजू दिलीप पाटील, लताबाई परदेशी, मंगला विकास चौधरी, उर्मिला नितीन पाटील, लताबाई प्रविण नारखेडे, मंगला दिलीप नारखेडे, नलीनी निरंजन नारखेडे, सुनंदा सुरेश नारखेडे, शर्मिला महाजन, उज्वला प्रमोद राणे, ललिता किशोर सुपे, जयश्री योगेश कोल्हे, शकुंतला किसन झोपे, वंदना प्रदीप चौधरी, शशिकला रेवा चौधरी, पुजा उमेश दिक्षित, गुणेश्री देवेंद्र झोपे इत्यादी महिला उपस्थित होत्या.




Comments

Popular posts from this blog

खान्देश नारीशक्ती चा राज्यस्तरीय नारीदिप सन्मान पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

होय आम्ही शिकणार.. संघर्ष करणार - चाळीसगाव येथील स्व.रामराव जिभाऊ पाटील शिष्यवृत्ती प्राप्त ४२५ विद्यार्थ्यांनी केला निर्धार ; आ.मंगेश चव्हाण यांचे शैक्षणिक दातृत्व