वडाळा आरोग्य उपकेंद्राला संतप्त ग्रामस्थांनी लावले कुलूप

वडाळा आरोग्य उपकेंद्राला संतप्त ग्रामस्थांनी लावले कुलूप

वडाळा प्रतिनिधी किशोर शेवरे

वडाळा प्रतिनिधी: वडाळा येथे मागील काही वर्षापासून आरोग्य सुविधा मिळत नसल्याने संतप्त ग्रामस्थांनी आरोग्य उपकेंद्राला कुलूप लावले. या ठिकाणी शासनाकडून आरोग्य विभागाच्या मार्फत मिळणाऱ्या विविध सुख सुविधा सर्वसामान्य नागरिकांना मिळाव्यात अशी ग्रामस्थांची मागणी आहे. या ठिकाणी नागरिकांना आरोग्य विभागाकडून गोळ्या,औषधी मिळाव्यात, त्याचप्रमाणे  महिला प्रस्तुती याठिकाणी व्हावी, आरोग्य उपकेंद्रात शौचालय व पाण्याची सोय करून मिळावी, तसेच वडाळा आरोग्य उपकेंद्रात कोण कोणते कर्मचारी यांची नियुक्ती केलेली आहे? त्यांचे नाव व कामाचे वेळापत्रक लावण्यात यावे. अशी गावातील सुज्ञ नागरिकांकडून मागणी करण्यात येत आहे. संबंधित आरोग्य विभागाच्या वरिष्ठांनी त्वरित या प्रकरणात लक्ष घालून योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत.

Comments

Popular posts from this blog

खान्देश नारीशक्ती चा राज्यस्तरीय नारीदिप सन्मान पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

होय आम्ही शिकणार.. संघर्ष करणार - चाळीसगाव येथील स्व.रामराव जिभाऊ पाटील शिष्यवृत्ती प्राप्त ४२५ विद्यार्थ्यांनी केला निर्धार ; आ.मंगेश चव्हाण यांचे शैक्षणिक दातृत्व