शिवसेना महिला आघाडीच्या सौ.सविताताई कुमावत यांच्यातर्फे महिला दिनानिमित्त कार्यक्रम संपन्न


शिवसेनेच्या महिला आघाडीच्या सौ.सविता ताई कुमावत यांच्यातर्फे जागतिक महिला दिन निमित्ताने प्रभाग क्र.०१ धुळे रोड भागातील शिव पार्वती नगर येथे कार्यक्रमाचे आयोजन

चाळीसगाव प्रतिनिधी:  सर्व प्रथम कार्यक्रमाची सुरूवात राजमाता जिजाऊ व सावित्रीबाई फुले यांचे प्रतिमापुजन करून झाले. महिला दिनाच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वैशालीताई अहिरे होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून व्यासपीठावर  वैशाली पाटील,नम्रता बाविस्कर, वैशाली ताई,आणु भाभी,ठाकरे मॅडम इत्यादी होते. कार्यक्रमाचे आयोजन सविताताई कुमावत (महिला दक्षता समिती सदस्य चाळीसगांव) यांनी केले होते.महिला दिनानिमित्त महिलांच्या मनोरंजनासाठी संगीत खुर्ची,लिंबू चमचा,बादलीत बॉल टाकणे इत्यादी.स्पर्धा आयोजित केल्या होत्या. संगीत खुर्ची स्पर्धेत प्रथम क्रमांक सुनंदा वाघ व द्वितीय क्रमांक कल्पना मोरे तसेच लिंबू चमचा स्पर्धेत प्रथम क्रमांक जयश्री राजपुत व द्वितीय क्रमांक उत्कर्षा वाघ आणि बकेट बाँल  स्पर्धेत प्रथम क्रमांक जयश्री राजपुत व द्वितीय क्रमांक शोभा वाघ यांनी पटकवला व त्यांना प्रथम व द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक देण्यात आले . तसेच आशा वर्कर्सचाही सत्कार करण्यात आला.आशा वर्कर पुनम चौधरी व रेखा मराठे यांचा सत्कार बक्षीस देऊन करण्यात आला.

              गेल्या दोन वर्षापासून कोरोनाची परिस्थिती होती त्यामुळे सार्वजनिक कार्यक्रम घेता येत नव्हते.सध्या कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आली आहे.  महिलांना एकत्र करण्याचा व मनोरंजनाच्या हेतूने महिला दिनाचं औचित्य साधून तालुका सदस्य दक्षता समिती चाळीसगाव, शिवसेना महिला आघाडी चाळीसगाव सौ.सविता किशोर कुमावत यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.कार्यक्रमात महिलांचा सहभाग उत्स्फूर्त दिसून आला.

       महिला दिन कार्यक्रम  आनंदात पार पडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वर्षाताई महाजन मॅडम यांनी केले तर सर्वांचे गोड आभार या प्रभागातील कर्तव्यदक्ष महिला, शिवसेना महिला आघाडी चाळीसगांव तालुका सदस्य दक्षता समिती चाळीसगाव सो.सविता किशोर कुमावत यांनी मानले.कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी धुळे रोड भागातील  महिलावर्ग यांनी सहकार्य केले.

Comments

Popular posts from this blog

खान्देश नारीशक्ती चा राज्यस्तरीय नारीदिप सन्मान पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

होय आम्ही शिकणार.. संघर्ष करणार - चाळीसगाव येथील स्व.रामराव जिभाऊ पाटील शिष्यवृत्ती प्राप्त ४२५ विद्यार्थ्यांनी केला निर्धार ; आ.मंगेश चव्हाण यांचे शैक्षणिक दातृत्व