महाविकास आघाडी सरकार जुनी पेन्शन नक्कीच लागू करतील हा विश्वास आहे- गणेश गुरव सर

महाविकास आघाडी सरकार जुनी पेन्शन नक्कीच लागू करतील हा विश्वास आहे- गणेश गुरव सर

फैजपूर प्रतिनिधी: महाराष्ट्र राज्य १९८२ ची जुनी पेन्शन योजना मिळावी यासाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन योजना संघर्ष समिती तर्फे गेल्या ९३ दिवसांपासून मुंबई येथे आझाद मैदानावर धरणे आंदोलन करण्यात येत आहे.मा.विधानपरिषद सभापती यांच्या सुचनेनुसार आणि शिक्षक व पदवीधर विधान परिषद सदस्यांनी विचारलेल्या २००५ पुर्वी नियुक्त व नंतर १०० टक्के अनुदानावर आलेल्या शिक्षक,शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सन १९८२ ची जुनी पेन्शन योजना मिळणे बाबत या तारांकीत प्रश्नावर राज्याचे उपमुख्यमंत्री व वित्त मंत्री ना.अजित पवार यांनी सभागृहात उत्तर दिले.यावेळी ना.पवार म्हणाले की सदरची बाब ही सुप्रीम कोर्टात न्यायप्रविष्ट असून कोर्टाचा निकाल आल्यानंतर प्राधान्य क्रमाने जुनी पेन्शन योजना लागू करणेबाबतचा मुद्दा महाविकास आघाडी सरकार तर्फे त्वरित विचारात घेतला जाईल व न्याय दिला जाईल.
           जुनी पेन्शन योजना संघर्ष समिती चे यावल रावेर तालुका प्रतिनिधी श्री.गणेश गुरव सर यांनीदेखील या निर्णयाचे स्वागत केले असून माननीय सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शालेय शिक्षण मंत्री व सर्व मंत्रीमहोदय, विरोधी पक्षनेते तसेच सर्वपक्षीय विधानसभा, विधानपरिषद सदस्य २००५ पुर्वी नियुक्त व नंतर १०० टक्के अनुदानावर आलेल्या शिक्षक,शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सन १९८२ ची जुनी पेन्शन योजना लागू करतील असा आशावाद मा.मुख्याध्यापक व संघर्ष समिती प्रतिनिधी श्री.गणेश गुरव सर यांनी व्यक्त केला आहे.
         
मुंबई येथे आझाद मैदानावर जुनी पेन्शन योजना संघर्ष समिती अध्यक्षा सौ.संगिता शिंदे-बोंडे (अमरावती) यांच्या मार्गदर्शनाखाली धरणे आंदोलन करण्यात येत असून आंदोलनावेळी जुनी पेन्शन योजना संघर्ष समिती चे कोअर कमिटी प्रमुख काकासाहेब कोल्हे (बीड), गायकवाड सर, डोईफोडे सर, पाटील सर (उस्मानाबाद), शिंदे सर (रायगड), गणेश गुरव सर फैजपूर (जळगाव) इ.उपस्थीत होते.

Comments

Popular posts from this blog

खान्देश नारीशक्ती चा राज्यस्तरीय नारीदिप सन्मान पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

होय आम्ही शिकणार.. संघर्ष करणार - चाळीसगाव येथील स्व.रामराव जिभाऊ पाटील शिष्यवृत्ती प्राप्त ४२५ विद्यार्थ्यांनी केला निर्धार ; आ.मंगेश चव्हाण यांचे शैक्षणिक दातृत्व