निपुण भारत हा विद्यार्थी केंद्री उपक्रम - आमदार मंगेश चव्हाण
चाळीसगाव तालुक्यासाठी बी-प्लस उपक्रमाचे आ.मंगेश चव्हाण यांच्या हस्ते उदघाटन
चाळीसगाव प्रतिनिधी: चाळीसगाव तालुक्यात गट विकास अधिकारी नंदकुमार वाळेकर यांच्या संकल्पनेतुन व गट शिक्षणाधिकारी विलास भोई यांच्या माध्यमातून शाळांसाठी B- plus अंतर्गत बाला उपक्रमाचे उदघाटन मा.आमदार मंगेश चव्हाण यांनी केले.तसेच शिक्षकांच्या शिकवणुकीमुळे मला कधीही व्यसनाने शिवले नाही.शिक्षक ही समाजाचे खरे आदर्श असतात.चाळीसगाव तालुक्यात अनेक शिक्षक चांगल्या संकल्पना मांडत असतात.त्यांचेही अभिनंदन असे मनोगत पंचायत समिती शिक्षण विभाग व कृतिशील शिक्षण मंच यांच्या यांच्या संयोजनाने तालुकास्तरीय शिक्षण परिषदेचे आयोजन राजपूत मंगल कार्यालय येथे आमदार मंगेश चव्हाण यांनी केले.अध्यक्षस्थानी गटविकास अधिकारी मा.नंदकिशोर वाळेकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून मा. विकास पाटील हे उपस्थित होते.
मा.विलास भोई गटशिक्षणाधिकारी व नंदकुमार वाळेकर साहेब यांनी बाला उपक्रम शाळेत कशा पद्धतीने सुरू आहे याचे कामकाज पीपीटी द्वारे मांडले.मा.आमदार शिक्षकांनी केलेल्या कामाने भारावले व दरवर्षी 50 लाख रु.फंडातून शाळांसाठी देण्याची घोषणा केली.शाळेच्या भौतिक सुविधा सुधारणे कामी केव्हाही मदतीस तत्पर राहील अशी ग्वाही दिली.तर शिक्षणअधिकारी मा. श्री विलास पाटील साहेबांनी मा. सीईओ साहेबांच्या संकल्पनेतून गटविकास अधिकारी माननीय नंदकिशोर वाडेकर स्वयम् प्रेरणेतून जिल्ह्यातून चाळीसगाव तालुक्यात बाला च्या माध्यमातून शाळा विकास करण्याचा आदर्श निर्माण केल्याची भावना व्यक्त केली.
तदनंतर गटविकास अधिकारी यांनी अध्यक्षीय भाषणातून अगदी शेवटच्या स्तरातील विद्यार्थ्यांना या उपक्रमातून मॉडेल स्कूल मधून शिक्षण मिळण्या कामी तालुक्यातून प्रथम दोन शाळांनी पूर्तता केल्यानंतर पुढील टप्प्यात 50 टक्के शाळा बाला उपक्रमातून परिपूर्ण होतील. प्रत्येकाच्या मानसिकतेला वळवण्याची कला माझ्यात आहे आणि ते मी प्रत्येक शिक्षकाकडून बाला उपक्रमाचे काम पूर्ण करून घेईल.स्वतःचा केव्हाही तुमच्यात काम करण्यासाठी मी सदैव उपस्थित राहील असा विश्वास दिला.मान्यवरांच्या प्रेरणात्मक शक्तीने चाळीसगाव विकास गटातील शिक्षक वृंदानी चाळीसगाव तालुक्यात असा उपक्रम प्रत्येक शाळेत राबविण्याचा मनोदय व्यक्त केला.
याकामी गटशिक्षणाधिकारी माननीय विलास भोई यांनी प्रेरणा सभा घेण्यापासून तर शेवटच्या घटकापर्यंत तुमच्याबरोबर राहू असा विश्वास व्यक्त केला.श्री भैय्यासाहेब वाघ यांनी सूत्रसंचालन केले तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री लक्ष्मण चव्हाण,महेंद्र सिसोदे,रामदेव राठोड,शिक्षण विभागाचे पंकज रणदिवे व कृतिशील शिक्षक मंच यांनी मेहनत घेतली.
Comments
Post a Comment