चाळीसगाव ग्रामीण पोलीसांनी केली चौघांना अटक; विवाहितेचे चोरीस गेलेले १३ तोळे सोने मिळाले परत

चाळीसगाव ग्रामीण पोलीसांनी केली चौघांना अटक; विवाहितेचे चोरीस गेलेले १३ तोळे सोने मिळाले परत

किशोर शेवरे चाळीसगाव प्रतिनिधी

चाळीसगाव प्रतिनिधी: चाळीसगांव ग्रामीण पोलीस स्टेशनला दिनांक 28/01/2022 रोजी फिर्यादी सौ. अंकिता प्रतीक पाटील, वय 25, धंदा- गृहीणी, रा. पोलीस क्वार्टर नं. 18 रुम नं. 265 ता. जि. अहमदनगर यांनी पोलीस स्टेशनला येऊन फिर्याद दिली की, दिनांक 27/01/2022 रोजी फिर्यादी व त्यांची आई असे अहमदनगर येथून मालेगांव व मालेगांव येथून चाळीसगांव आले व चाळीसगांव राष्ट्रीय विद्यालय येथून पॅजो रिक्षात बसून हिरापूर येथे फिर्यादीचे लग्नाचे सोन्याचे दागिन्यांचा बॉक्स त्यांचे कपडयांचे बॅगेत ठेवून घेऊन जात असतांना त्या दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी त्यांचे कपड्यांच्या बॅगेचा कप्प्याची चैन उघडून त्याचा मधला कप्पा कापून त्यातील 5,32,000/- रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा बॉक्स चोरुन नेला होता. त्यावरुन चाळीसगांव ग्रामीण पोलीस स्टेशनला दिनांक 28/01/2022 रोजी गुरनं. 85/2022 भादंवि कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याचा तपास मा. पोलीस निरीक्षक सो.संजय ठेंगे साहेब यांचे आदेशाने पोना/2574 नितीन किसन आमोदकर हे करीत आहेत.
         सदर गुन्हयाच्या तपासात आरोपीचा काहीएक मागमूस नसतांना पोहेकॉ/2650 युवराज बंडू नाईक, पोना/2574 नितीन किसन आमोदकर, पोना/991 गोवर्धन राजेंद्र बोरसे, पोना/2865 शांताराम सिताराम पवार यांनी मा. पोलीस निरीक्षक सो यांचे मार्गदर्शनाखाली त्यांचे गोपनिय सुत्र वापरून दिनांक 03/02/2022 रोजी आरोपी 1) अजय अंबादास घुमडकर, वय 23, रा. संतोषी माता मंदीराजवळ, बस स्टॅन्डच्या मागे, चाळीसगांव. 2) रविंद्र मल्लू घुमडकर, वय 35, रा. खरजई नाका, टाकळी प्र.चा.ता. चाळीसगांव. 3) विकी बाबू घुमडकर वय 24, रा. खरजई रेलवे गेटजवळ, चाळीसगांव. 4) नितेश शिवाजी पंच, वय 21, रा. म्हसरुळ, गॅस गोडाऊन जवळ, पंचवटी नाशिक यांना ताब्यात घेतले. त्यांनी सुरवातीला उडवा-उडवीची उत्तरे दिली. परंतु कसून विचारपूस केली असता गुन्हा त्यांनी केल्याचे कबूल केले. म्हणून त्यांना गुन्ह्यात अटक करुन त्यांची 5 दिवस पोलीस कस्टडी रिमांड मिळवून त्यांचे त्याब्यातून 27500/- रुपये रोख व 5,84,700 /- रुपये कि.ची 13 तोळ्याची सोन्याची लगड असा एकूण 6,12,200/ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. घटनेनंतर अवघ्या सात दिवसांत पोलीस पथकाने चोरट्यांचा
    काहीएक मागमूस नसतांना आरोपी निष्पन्न करुन त्यांना अटक केली आहे. सदर गुन्ह्यात जप्त 5,84,700 /- रुपये कि.ची 13 तोळ्याची सोन्याची लगड ही आज रोजी फिर्यादी सौ. अंकिता प्रतिक पाटील यांना मा. न्यायालयाच्या आदेशाने परत देण्यात आली आहे.याबद्दल फिर्यादी सौ.अंकिता पाटील यांनी चाळीसगाव ग्रामीण पोलीसांचे आभार मानले आहेत.

Comments

Popular posts from this blog

खान्देश नारीशक्ती चा राज्यस्तरीय नारीदिप सन्मान पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

होय आम्ही शिकणार.. संघर्ष करणार - चाळीसगाव येथील स्व.रामराव जिभाऊ पाटील शिष्यवृत्ती प्राप्त ४२५ विद्यार्थ्यांनी केला निर्धार ; आ.मंगेश चव्हाण यांचे शैक्षणिक दातृत्व