गोव्यात देखील चालला आमदार मंगेश चव्हाण यांचा करिष्मा
पक्षश्रेष्ठींचा विश्वास सार्थ ठरवत गोव्यातील नावेलीम मध्ये इतिहासात पहिल्यांदा फुलवल कमळ
हाय व्होल्टेज लढतीत भाजपा उमेदवार उल्हास तुयेकर विजयी,
आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह चाळीसगाव तालुक्यातील ३० हून अधिक भाजपा पदाधिकारी यांच्या मेहनतीला यश...
नावेलीम (गोवा) - गोव्याचे लोकप्रिय नेते स्व.मनोहर पर्रीकर यांच्या निधनानंतर पहिल्यांदा पार पडत असलेल्या गोवा निवडणुक प्रभारी पदाची जबाबदारी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांच्याकडे केंद्रीय नेतृत्वाने सोपवली होती. महाराष्ट्र गोमंतक पक्षाशी असलेली युती तुटल्याने भाजपाने यावेळी गोव्यात प्रथमच सर्वच्या सर्व ४० जागांवर निवडणूक लढवली होती. देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू शिलेदार माजीमंत्री गिरीषभाऊ महाजन यांच्यावर गोव्यात आजवर ज्या जागांवर भाजपा जिंकलेली नाही अश्या काही मोजक्या जागांची जबाबदारी देण्यात आली. देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात माजीमंत्री गिरीषभाऊ महाजन यांनी आपल्या कौशल्याने या सर्व जागांचा अभ्यास केला व रणनीती ठरवली. त्यातील भाजपा स्थापनेपासून एकदाही निवडणूक लढलेली नाही अश्या नावेलीम मतदारसंघाची संपूर्ण जबाबदारी गिरीषभाऊ यांनी चाळीसगाव मतदारसंघाचे आमदार मंगेश चव्हाण यांना दिली.
आमदार मंगेश चव्हाण यांनी देखील भाजपा उमेदवार उल्हास तुयेकर यांना सोबत घेत पूर्णवेळ गोव्यात ठाण मांडून बसत बुथप्रमुख, मतदारांशी होम टू होम संवादावर भर दिला. नवीन युवा मतदारांच्या बैठका घेतल्या तसेच भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डाजी, युवा मोर्चा राष्ट्रीय अध्यक्ष खासदार तेजस्वी सुर्या यांच्या भव्य जाहीर सभा देखील नियोजित केल्या.
भाजपा पहिल्यांदा निवडणूक लढत असल्याने या मतदारसंघात अनेक अडचणींचा सामना त्यांना करावा लागला. गोव्यात सत्तेत येण्यासाठी नावेलीम ची जागा अतिशय महत्वाची असल्याने कॉंग्रेस, आप, शिवसेना, राष्ट्रवादी ने देखील तुल्यबळ उमेदवार या मतदारसंघात दिले होते. शेवटच्या ५ दिवसात आमदार मंगेश चव्हाण यांनी चाळीसगाव येथील ३० हून अधिक भाजपा पदाधिकारी यांना गोव्याला बोलावून घेत त्यांना मतदारसंघातील ३९ बूथ यांची जबाबदारी दिली. भाजपा पदाधिकारी यांनी प्रत्येक बुथप्रमुख, भाजपा मतदार यांच्याशी संपर्क साधून होम टू होम प्रचार केला. ज्या बुथवर काही समस्या असतील किंवा कुठे कमी पडत असू त्याचा अहवाल आमदार मंगेश चव्हाण यांच्याकडे दिला.
आमदार चव्हाण यांनी पक्षश्रेष्ठींचा विश्वास सार्थ ठरवला असून अश्यक्य अश्या नावेलीम मतदारसंघात कमळ फुलवत भाजपा उमेदवार उल्हास तुयेकर यांनी विजय संपादन केला आहे. आमदार मंगेश चव्हाण व चाळीसगाव तालुक्यातील भाजपा पदाधिकारी यांच्या मेहनतीला मिळालेल्या यशाने तालुक्यातील कार्यकर्त्यांचा उत्साह देखील दुणावला आहे.
Comments
Post a Comment