प्रसन्न ज्येष्ठ नागरीक मंडळातर्फे विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा सत्कार संपन्न



 प्रसन्न ज्येष्ठ नागरीक मंडळातर्फे विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा सत्कार संपन्न

जळगाव प्रतिनिधी: जागतिक महिला दिनानिमित्त भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात प्रसन्न ज्येष्ठ नागरिक मंडळ शिव कॉलनी व ज्येष्ठ नागरीक एल्डर हेल्पलाईन यांच्या संयुक्त विद्यमाने मा.जिल्हाधिकारी श्री.अभिजित राऊत यांच्या हस्ते विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला. त्यामध्ये कु.शिवांगी काळे, आदर्श शिक्षिका व साहित्यिक श्रीमती ज्योती राणे, नारीशक्ती बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा सौ. मनिषा पाटील, मानसी पाटील आणि नगरसेविका दीपमाला काळे यांचा सन्मान करण्यात आला. या वेळी मंडळाने तयार केलेल्या स्वातंत्र्य सेनानीच्या माहितीसह चित्र प्रदर्शनीचे उद्घाटन मा जिल्हाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांनी सदर चित्र प्रदर्शनीची प्रशंसा केली. या कार्यक्रमात जिल्हाधिकाऱ्यांसह मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. जिल्हाधिकाऱ्यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या उपक्रमाविषयी गौरवोद्गार काढले. महाराष्ट्र राज्य फेस्कामचे माजी अध्यक्ष श्री डी. टी. चौधरी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यांनी नारीशक्तीचे महत्व प्रतिपादन केलें. डॉ रागीब अहमद यांनी मानसिक आरोग्यावर मार्गदर्शन केले. 

          कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरीक संघाच्या खान्देश ज्येष्ठ नागरिकांच्या हेल्प लाईनविषयी सौ मिनाक्षी कोळी यांनी मार्गदर्शन केले. विभागाचे प्रमुख श्री जगतराव पाटील होतें.या प्रसंगी मंडळाचे अध्यक्ष डॉ सुरेश राणे, कार्यकारिणी संचालक तसेच नगरसेवक श्री सचिन पाटील व ज्येष्ठ नागरीक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री तुषार वाघुळदे यांनी केले आणि आभारप्रदर्शन श्री ए एम जंगले यांनी केले.


Comments

Popular posts from this blog

खान्देश नारीशक्ती चा राज्यस्तरीय नारीदिप सन्मान पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

होय आम्ही शिकणार.. संघर्ष करणार - चाळीसगाव येथील स्व.रामराव जिभाऊ पाटील शिष्यवृत्ती प्राप्त ४२५ विद्यार्थ्यांनी केला निर्धार ; आ.मंगेश चव्हाण यांचे शैक्षणिक दातृत्व