हभप रेवाबाबा चौधरी यांच्या स्मरणार्थ खान्देश नारीशक्ती तर्फे २५० विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप
हभप रेवाबाबा चौधरी यांच्या स्मरणार्थ खान्देश नारीशक्ती तर्फे २५० विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप
फैजपूर प्रतिनिधी: फैजपूर येथील सामाजिक कार्यकर्ते व खान्देश नारीशक्ती फाऊंडेशन अध्यक्षा सौ.दिपाली चौधरी झोपे यांचे वडील ह.भ.प.स्व.रेवा चुडामण चौधरी यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शहरातील भक्त मंडळ संचलित पी.वाय.चौधरी विद्या मंदिर येथील सर्व विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वही,पेन वाटप करण्यात आले. दरम्यान यावेळी जवळपास २५० विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
यावेळी सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन करुन पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे कार्याध्यक्ष व भाजपचे प्रदेश सदस्य श्री.भास्कर काशीराम चौधरी उर्फ बी.के.चौधरी हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून फैजपूर शहर पोलीस स्टेशन चे स.पोलीस निरीक्षक श्री.सिद्धेश्वर आखेगावकर साहेब, फैजपूर शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री.सलीम पिंजारी, इंडियन जर्नलीस्ट असोसिएशन जळगाव जिल्हा उपाध्यक्ष व पत्रकार संस्था फैजपूर उपाध्यक्ष श्री.संदीप पाटील, मुख्याध्यापिका पुनम छगन चौधरी यांची उपस्थिती होती.
याप्रसंगी खान्देश नारीशक्ती फाऊंडेशन अध्यक्षा सौ.दिपाली चौधरी झोपे यांनी मनोगत व्यक्त करताना त्यांचे वडील स्व.रेवा बाबा चौधरी व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याची सविस्तर माहिती दिली. यावेळी पी.वाय.चौधरी शाळेच्या मुख्याध्यापिका पूनम चौधरी यांच्यासह दिलीप धोंडू तेली,शिल्पा सुभाष बढे,चारिका जनार्दन नेमाडे, विशाल मनोहर तायडे, शुभांगी जगदिश ढोले,खेमराज भंगाळे,न्याजोद्दीन तडवी, रुपाली बढे,सरीता साळी, महेश नारखेडे, देवेंद्र झोपे सर,गुणेश्री झोपे, पार्थ झोपे उपस्थित होते.
Comments
Post a Comment