नारिदिप सन्मान पुरस्कार २०२२ साठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन; निवड समिती स्थापन
राज्यस्तरीय नारिदिप सन्मान-२०२२ पुरस्कार निवड समिती जाहीर
जळगाव प्रतिनिधी: जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने दरवर्षी प्रमाणे यंदाही राज्यस्तरीय नारिदिप सन्मान २०२२ पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात येणार असून यावर्षी च्या पुरस्कारार्थींची निवड करण्यासाठी खान्देश फाऊंडेशन च्या वतीने ७ महिलांची निवड समिती जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये अश्विनी कोळी शिक्षीका न्हावी, वैशाली बाविस्कर केंद्र प्रमुख भादली, अरुणा धाडे भुसावळ-कतार, भारती काळे-पाथरवट हेल्थ प्लस इन्स्टिट्यूट जळगाव, अर्चना सुर्यवंशी नोबेल स्कूल पाळधी, रुबीना पटेल सामाजिक कार्यकर्त्या नांदूरा, नयना पाटील रावेर, पल्लवी भारंबे आरोग्य सेविका यावल या महिला सदस्यांचा समावेश आहे. मागील वर्षी पुरस्कार मिळालेल्यांमधून हि तज्ञ निवड समिती गठीत करण्यात आलेली असून यावर्षी देखील पुढील महिन्यात राज्यस्तरीय नारिदिप सन्मान पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात येणार आहे.
| नारिदिप सन्मान २०२१ चे संग्रहित छायाचित्र |
विविध क्षेत्रातील इच्छुक महिलांनी दि.१६ मार्चपर्यंत आपल्या कार्याची माहिती निवड समिती सदस्यांना पाठवावी त्यानंतर निवड झालेल्या पुरस्कारार्थींची माहीती सोशल मीडिया वर जाहीर करण्यात येणार आहे. असे आवाहन खान्देश जनसेवा फाऊंडेशन, खान्देश न्युज नेटवर्क चे संस्थापक संदीप पाटील, खान्देश नारीशक्ती फाऊंडेशन अध्यक्षा सौ.दिपाली चौधरी झोपे, नारीशक्ती गृप अध्यक्षा मनिषा पाटील यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी ९९७५४०५४८८ या क्रमांकावर व narideepaward2021@gmail.com या इमेल वर संपर्क साधावा.
| नारिदिप सन्मान २०२१ चे संग्रहित छायाचित्र |
नेहा संतोष जगताप
ReplyDelete