आमदार मंगेश चव्हाण यांचा मुंबईत घर घेण्यास नका; ,रुग्णांच्या नातेवाईकांसाठी निवारा बांधण्याची केली मागणी...
आमदार मंगेश चव्हाण यांचा मुंबईत घर घेण्यास नकार,
रुग्णांच्या नातेवाईकांसाठी निवारा बांधण्याची केली मागणी...
राज्यातील ग्रामीण भागातील आमदारांना मुंबईत ३०० घरे देण्याची घोषणा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी विधानसभेत केली असता त्यावरून राज्यात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
चाळीसगाव तालुक्याचे आमदार मंगेश चव्हाण यांनी देखील या विषयावर आपली भूमिका स्पष्ट केली असून आमदारांना घरे नकोत राज्यातून मुंबईत दाखल होणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांसाठी हक्काचा निवारा बांधा अशी मागणी त्यांनी केली आहे.
काय म्हणाले आमदार चव्हाण...?
राज्यातील शेतकरी व सर्वसामान्य वर्गाच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष करून आमदारांना घरे देण्याचा महाविकास आघाडी सरकारचा निर्णय चुकीचा असून मी वैयक्तिक रित्या आमदार या नात्याने याचा विरोध करतो.
घर नाही म्हणून कोणता आमदार मुंबईत रस्त्यावर झोपला असं आजवर झाले नाही.
आमदारांऐवजी ग्रामीण भागातील हजारो रुग्ण मुंबईत उपचारासाठी येतात त्यांच्या नातेवाईकांना निवाऱ्यासाठी ती घरं उपलब्ध करून देण्यात यावीत अशी मागणी मी यानिमित्ताने करतो अशी प्रतिक्रिया आमदार मंगेश चव्हाण यांनी दिली आहे.
This comment has been removed by the author.
ReplyDeleteMangesh chavan Sahebchya matadhi mi sahamt ahe.
ReplyDelete