रेशनकार्ड नसले तरीही मिळेल रेशन...केंद्रसरकारचा निर्णय
रेशनकार्ड नसले तरीही मिळेल रेशन...केंद्रसरकारचा निर्णय
नवी दिल्ली: शासनाच्या वतीने नागरिकांना रेशन वितरित केले जाते. याचा अनेक गोरगरिबांना मोठ्या प्रमाणावर फायदा होते. कोरोना सारख्या गंभीर महामारीत लोकांना रेशनच्या धान्याचा मोठा आधार होता. याबाबत केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. रेशन धान्य दुकानात धान्य घेताना रेशन कार्ड देणं गरजेच होते. मात्र आता शिधापत्रिका धारक जिथे राहतात, तेथील रेशन दुकानात फक्त रेशन कार्ड नंबर आणि आधार नंबर सांगितल्यानंतर त्यांना रेशन मिळणार आहे, अशी माहिती सार्वजनिक वितरण मंत्री पियुष गोयल यांनी दिली आहे.
काय म्हणाले केंद्र सरकार?
सध्या रेशन कार्ड प्रक्रिया सोपी करण्यात आली असून देशात वन नेशन वन रेशन कार्डची सुविधा लागू करण्यात आली आहे. त्यामुळे जर एखाद्या व्यक्तीचे रेशनकार्ड त्याच्या मूळ राज्यात असेल आणि तो नोकरीनिमित्त दुसऱ्या शहरात आपल्या कुटुंबासह राहत असेल, तर त्याला त्याचा रेशनकार्ड क्रमांक आणि आधार कार्डची माहिती देऊन कोणत्याही रेशन दुकानातून धान्य मिळू शकते. यासाठी त्यांना मूळ रेशन कार्ड दाखवण्याची गरज नाही. अशी माहिती केंद्र सरकारने दिली आहे.
Process Kaisa honga
ReplyDelete